फोटोग्राफीतला ‘भरत’- छायाचित्रकार भरत पवार
फोटोग्राफीतला ‘भरत’- छायाचित्रकार भरत पवार
आज मराठी चित्रपट ,नाटक या क्षेत्रात जाहिरातीच शुटिंग, पब्लिसिटी शुट या सर्वांना खूप महत्व आलं आहे. या कामामध्ये काम करणार्या छायाचित्रकारांना केवळ नुसते फोटो काढून चालत नाही तर चित्रपटाच्या थीमचा अभ्यास , चित्रपटात असणारे कलाकार त्यांच्या अभिनयाच्या छ्टा यांचंही भान राखणं गरजेचं असतं. अशा'पडद्यामागच्या' छायाचित्रकारांमध्ये घेतलं जाणार आजचं एक महत्वाचं नाव म्हणजे 'भरत पवार'.
हा तरूण छायाचित्रकार या क्षेत्रात आल्यापासून त्याच्या कामाचा आवाका खूप वाढला आहे. मूळात सेलिब्रिटींमध्ये भरत पोर्टफोलिओ शुटसाठी खूप लोकप्रिय आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले 'ऑन डयुटी २४ तास', 'डावपेच' हे चित्रपट असो किंवा सध्या झी मराठीवर गाजत असलेला ' एकापेक्षा एक अप्सरा आली' 'सारेगमप' हे कार्यक्रम असो किंवा रंगभूमीवर आलेलं संदेश कुलकर्णीच 'पुनश्च हनिमुन' असो सगळीकडे भरत पवारचं काम आपल्याला जाणवतं . आपल्या या सदरातून आपण अशाच 'पडद्यामागच्या कलाकारांचा' शोध घेत असतो. या अशाच कलाकाराचा हा मनसोक्त संवाद फक्त तुमच्यासाठी .....
* एक छायाचित्रकार म्हणून तुमची कामाची व्याप्ती किती मोठी आहे, म्हणजे या कामात काय काय समाविष्ट असतं?
-मी या क्षेत्रात कामाला सुरूवात करून फक्त ४-५ वर्षे झाली आहेत. हळूहळू कामातून नवीन ओळखी तयार झाल्या. काम वाढली, यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे एक वर्षापासून मी माझ्या स्वत:च्या स्टूडिओमध्ये काम करतोय. झी मराठी, झी टॉकीज, चित्रपटांसाठी केलं जाणारं फोटोशुट, पोर्ट फोलिओ आणि शुटिंग अशी अनेक काम मी करतो. काम करण्याचं तर खूप डोक्यात आहे. हिंदी सेलिब्रिटींसोबत काम करण्याची खूप इच्छा आहे.चित्रपटांसाठी केलं जाणार फोटोशुट आहे. त्यामध्ये 'गलगले निघाले','हाय काय नाय काय','गुलदस्ता','डावपेच' आहेत.
नाटकांबद्दल बोलायचं झाल्यास नुकतचं प्रदर्शित झालेलं आणि 'झी गौरव'मध्ये यश मिळवणारं संदेश कुलकर्णीचं नाटक म्हणजे 'पुनश्च हनिमुन'या नाटकांच मी पब्लिसिटी शुट केलं होतं. त्याचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कामांबरोबर आजच्या आघाडीचे सर्व मराठी कलाकारांबरोबर मी काम केलं आहे. त्यामध्ये सिध्दार्थ जाधव, विभावरी देशपांडे, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी,स्वप्नील जोशी अशी अनेक नावं घेता येतील, यासगळयांबरोबर मी काम केलं आहे.
* लहानपणापासूनच या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती का?
- तसं पाहायला गेलं तर या क्षेत्राचा आणि माझा कॉलेजला असल्यापासून जवळचा संबंध आला. माझं कॉलेजचं शिक्षण सुरू होतं तेव्हापासून मी एका फोटो लॅबमध्ये पार्ट टाईम जॉब करायचो. तिथे अनेक प्रकारचे फोटो डेव्हलप होण्यासाठी येत असत. ते काम करताना मला जाणवलं की अरे हे काम खूप इंटरेस्टिंग आहे. या कामात आपण क्रिएटिव्ह काम करू शकतो. तेव्हा मी अतुल शिधयेंकडे काम करत होतो. तेव्हा मी ठरवलं की आपण फोटोग्राफीमध्ये करिअर करायला हवं.
* तुमच्या या निर्णयामध्ये घरातल्यांचा सहभाग कसा होता?
- मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून या क्षेत्रात आलो. त्यामुळे माझ्या घरच्यांना या करिअरविषयी फार माहिती नव्हती. मात्र सगळयात महत्वाचं म्हणजे माझ्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. करिअरच्या निर्णयामध्ये घरच्यांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं. याबाबतीत मी म्हणेन की केवळ घरातलेच नाही तर माझ्यासोबत काम करणारी माझी टीम तितकीच सपोर्टिव्ह आहे. माझी देवावर श्रध्दा आहे. माझा माझ्या देवावर आणि माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. आज मी जो काही आहे तो माझ्या घरच्यांमुळं आहे.

* फोटोग्राफीचं रीतसर प्रशिक्षण तुम्ही घेतलं का?
- मला खरंच असं शिक्षण घ्यायला नक्की आवडलं असतं. मात्र कॉलेज आणि जॉबमुळं मला असा कोर्स करता आला नाही. भविष्यात अशी संधी मिळाली तर नक्कीच मला असा कोर्स करायला आवडेल. प्रत्येक शिक्षणासाठी थिअरी महत्वाची आहेच. मात्र तेवढेच अनुभव ही महत्वाचा आहेच. मला त्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं. अतुल शिधयेंकडे मी शिकलोच शिवाय बंटी प्रशांत जे मोठे फॅशन फोटोग्राफर आहेत त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली हे फार महत्वाचं आहे.
* तुमची पहिली असाईनमेंट आणि मिळालेलं पहिलं व्यावसायिक यश कुठल होत?
- अतुल सरांकडं शिकत असताना मला कामाचा अनुभव मिळत होता. सुरूवातीपासूनच मी अनेक प्रयोग करून पाहत होतो. माझ्या सृजनशीलतेचा मला खूप फायदा झाला. पहिल्या असाइनमेंटबद्दल बोलायचं झाल तर आजची आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिला मी माझी कल्पना सांगितली. तिचं मी फोटोशुट केलं. या माझ्या पहिल्याच कामाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 'गलगले निघाले','हाय काय नाय काय'च काम मी केलं. हा माझा पहिला व्यावसायिक ब्रेक म्हणता येईल. माझ्या कामाची पध्दत लोकांना आवडली. त्यातून मला काम मिळत गेली.
* सेलिब्रिटींव्यतिरिक्त इतर क्षेत्रातल्या मान्यवरांचं फोटोशुट तुम्ही केलं आहे का?
- केवळ आजच्या आघाडीचे कलाकार नाही तर चित्रपटसृष्टीतले सिनिअर आर्टिस्ट म्हणजे अशोक सराफ, महेश कोठारे, रमेश देव, सचिन पिळगावंकर यांचं फोटोशुट केलं.या जेष्ठ कलाकारांबरोबरच आजचे आघाडीचे भरत जाधव, मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांचेही फोटोशुट केलं आहे. या कामाचं खूप कौतुक झालं. नुकताच झालेला किशोरी आमोणकरांचा 'सहेला रे'कार्यक्रमाचं पब्लिसिटी शुट केलं होतं. अमोल पालेकरांसोबत काम केलं या कामाचा खूप निराळं समाधान मिळतं. सेलिब्रिटींबरोबर मला असं काम करायला मिळाव असं मला मनापासून वाटतं. आज मला हळहळ वाटती की भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आज हयात नाहीत. पण त्यांचं फोटोशुट मला करायला मिळालं नाही.
* फोटोग्राफर म्हणून तुमच्या दृष्टीने सौंदर्याची व्याखा काय आहे?
- मला वाटतं या जगात कोणीच कुरूप नाही. सर्वजण सुंदर आहेत. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातील बलस्थानं शोधणं हे एका फोटोग्राफरचं काम असतं असं मला वाटतं. प्रत्येकामध्ये एक लपलेलं सौंदर्य असतं ते प्रकाशित करण्याचं काम मी करतो. मी म्हणेन की हा माझा प्रयत्न सुरू आहे.

* चित्रपटाचं फोटोशुट करताना तुम्हाला चित्रपटातल्या कॅरेक्टर्सचा अभ्यास करावा लागतो का?
- हो नक्कीच करावा लागतो. 'गलगले निघाले','हाय काय नाय काय','गुलदस्ता' या चित्रपटाचं काम मी केलं होतं. आत्ता नुकताच प्रदर्शित झालेला 'ऑन डयुटी २४तास' आणि 'डावपेच' या प्रत्येक चित्रपटाचा विषय , ट्रिट्मेंट, मूड, कॅरेक्टरचा अभ्यास करूनच फोटोशुट करायला लागतं. 'ऑन डयुटी २४ तास'च काम सुध्दा खूप चांगलं झालं.
* या क्षेत्राकडे येण्यापूर्वी तरूणांच्या काही कल्पना असतात, तर काम सुरू करण्यापूर्वी काही तयारी करणं गरजेचं असतं का?
- या क्षेत्राकडे अनेकांचा ओढा असतो. मात्र मी म्हणेन की त्यासाठी निश्चितच कष्टाची तयारी आणि अभ्यासाची गरज आहे. बाहेरून हे फिल्ड ग्लॅमरस असलं तरी ते खूप हार्डवर्कनी करायला लागतं. प्रत्येक काम उत्तम व्हावं हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. मी अजून फार मोठा झालेलो नाही. मात्र हे मी नक्की सांगू शकतो.
भरत सध्या अनेक नवीन प्रोजेक्टवर काम करतोय. या गुढीपाडव्याला त्याच्या संकल्पनेवर आधारित एक नवा उपक्रम तो राबवणार आहे. या कामाविषयी बोलताना तो खूप उत्साहित होता. या क्षेत्रातल्या त्याच्या आदर्शांविषयी त्याला छेडलं असता तो चटकन गौतम राजाध्यक्ष, अतुल कसबेकर, प्रसाद नाईक, सुरेश नटराजन यांची नावं घेतो. अतुल शिधये आणि बंटी प्रशांतविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. भरतला त्याच्या पुढच्या कामासाठी 'मम टीम'कडून शुभेच्छा!!
अशा गुणी कलाकाराची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असणार. मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.
- मोहिनी वागेश्वरी
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































