ब्लॉग्ज

स्वप्नील जोशी's picture

धम्माल अनुभव .....

swapnil1.jpg
गेल्या शुक्रवारी म्हणजे २४ डिसेंबरला केदार शिंदेचा 'ऑन डयुटी चोवीस तास' प्रदर्शित झाला. पुढच्या शुक्रवारी ३१ डिसेंबरला सचिनजींचा 'आयडियाची कल्पना' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. हे दोन्ही चित्रपट मोठया बॅनरचे आणि खूप अपेक्षा घेऊन येणारे चित्रपट आहेत. या दोन्ही सिनेमांमध्ये माझा खारीचा वाटा आहे. दोन्ही चित्रपटात मी स्पेशल अ‍ॅपरिअन्सचं गाणं केलं आहे.

प्रिया बापट's picture

नवं नाटक नवा राज्य ...

'शुभं करोति' या मालिकेमुळे मला तुम्हा रसिकांचं खूप प्रेम मिळालं.

विभावरी's picture

ओंजळभर पाणी

अथांग सागरातल ओंजळभर पाणी जेव्हा मी माझ्या हातात धरते,
तेव्हा वाटतं.....हे माझं..हक्काचं..
मग ते पाणी बोटातून ओघळून जाताना उघड्या डोळ्यांनी पहात राहते..
ओले हात फक्त उरतात तेव्हा कळत...
सागराला ओंजळीत धरता येणार नाही मला कधीच..
तो माझा नाही
ते ओंजळभर पाणीही माझं नाही.....
माझं पाणी.... फक्त डोळ्यातलं.....

विजय केंकरे's picture

विजय केंकरे- विश्व मराठी नाटयसंमेलन : न्यू जर्सी

मे महिन्याच्या सुरूवातीला न्यू जर्सीमध्ये विश्व मराठी नाटयसंमेलन झोकात पार पडलं. खूप कष्ट घेऊन, त्रास सहन करून बरीच मंडळी न्यू जर्सीला पोहोचली होती. काही मंडळींना व्हिसा मिळाला होता, तर काहींना मिळाला नाही. त्याशिवाय माझ्या ओळखीच्या मंडळींनीं मला एक गोष्ट सांगितली त्यामुळे मला विशेष आनंद झाला. विश्व मराठी नाट्यसंमेलनात केवळ मराठीच नाही तर स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटीश डेलीगेट्स आले होते आणि त्यांच्या कानात इअरफोन असून आपले नाटयप्रयोग ती मंडळी त्यांच्या भाषेतून समजावून घेत होती.ही खरंच आनंदाची गोष्ट होती.

डॉ. सलील कुलकर्णी's picture

दमलेल्या बाबाची कहाणी..

डॉ. सलील कुलकर्णी ,

http://www.loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20100123/ch11.jpg
संगीतकार म्हणून सूर-तालाशी खेळताना, गायक म्हणून शब्द-सूर आळवताना रसिकांशी सुरेल नातं जुळत जातं. बघता बघता ते अबोल नातं बोलकं होतं आणि मग गप्पांची मैफल जमवायची इच्छा अनिवार होते.. दर १५ दिवसांनी ही सुरेल मैफल अनुभवता येईल.

विभावरी's picture

न सुचलेल्या कवितेचं भूत

माझ्या न सुचलेल्या कवितेचं भूत रोज माझ्या मानगुटीवर बसतं
गोंधळलेल्या,काळ्या,अशांत,जीवघेण्या रात्री.
जेव्हा माझ्या अपुर्या स्वप्नांचे,अतृप्त वासनांचे,फसलेल्या यमकांचे,चुकलेल्या गणितांचे,अस्फुट चित्कारांचे घाव बसतात माझ्या मनावर.

जगण्याच्या चौकटी आखताना आपसूक बाजूला सारलेलं,
आत आत कुठेतरी दाबलेलं,
पचवलंय असं वाटलेलं,
नाकारलंय असं मानलेलं,
'उद्या पाहू' च्या सदरात मोडलेलं.
स्वप्नाळू वगैरे डोळ्यांना न झेपलेलं,
मोडक्या खांद्यांना नं पेललेल
पंख बांधून पदरात लपवलेलं.
साखरेत घोळून पोटात दडवलेलं,
माझं, तुझं, तिचं, त्याचं...
सगळं पिशाच्च्यासारख उभं ठाकतं समोर.

प्रिया बापट's picture

नव्या चित्रपटाच्या निमित्ताने...

" मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" च्या यशानंतर आता पुन्हा एकदा "आनंदी आनंद " च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर येत्ये. वर्षभरापूर्वी चित्रीकरण झालेला आणि माझी प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ७ मे ला प्रदर्शित होत आहे. शिवाजी आणि शुभंकरोतीने जशी नवीन ओळख दिली तशीच हा चित्रपटही देईल. साधी, सोप्पी कथा. मजा करणारी, संगीतात रमणारी, गावं आवडणारी, निसर्गात रमणारी अश्या आनंदीची हि गोष्ट.

सोनाली कुलकर्णी's picture

पुन्हा एकदा मी,सिध्दू आणि केदार सर.

ज्या केदार सरांनी 'बकुळा नामदेव घोटाळे'या चित्रपटाने मला या इंडस्ट्रीत लाँच केलं त्यांच्याच सोबत पुन्हा एकदा 'इरादा पक्का'हा चित्रपट करतांना खूप आनंद झाला.
'बकुळा नामदेव घोटाळे'च्या वेळेस मी अगदी कोरी पाटी होते.मला काहीही माहित नव्हतं. केदार सरांनी मला अक्षरशः बोट धरून चालायला शिकवलं.खरचं मनापासून सांगते ते माझे गुरु आहेत.
त्यांनी जेंव्हा मला पुन्हा एकदा त्यांच्या चित्रपटासाठी विचारलं तेंव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. केदार सरांनी आतापर्यंत त्यांच्या चित्रपटात कोणत्याही हिरोईनला रिपीट केलेलं नाही. पण माझ्याबाबतीत हे घडलं याचा मला खूप आनंद आहे.

विभावरी's picture

का गं तुझे डोळे ओले??

माझ्या आय टच शी खेळत होते. इतक्या पसार्यतून् काहीतरी एक निवडायचं आणि ऐकायचं. त्या क्षणी जे वाटेल ते.... अचानक दिसलं 'जो तुम तोडो पिया मै नाही तोडू' 'सिलसिला मधलं नाही, जुनं,,झनक झनक पायल बाजे'!..लता दीदींचा तो स्वर्गीय स्वर, वसंत देसाईंच अद्भुत संगीत....ऐकता ऐकता एक ओळ आली ' तुम मेरे ठाकूर, मै तेरी दासी' ..आणि मी थबकले. तंद्री मोडली..कधीकधी एखादा शब्द, एखादं सहज म्हणून केलेलं विधान एक भलतीच विचारधारा सुरु करून जातं. विनाकारण, संदर्भहीन..'मी तुझी दासी. ...टोकाचं समर्पण आहे हे...स्वतःला विसरून कुणाच्या तरी स्वाधीन व्हायचं. मीराबाईच करू जाणो!! आणि समोर कृष्ण होता!! भलता सलता नाही कुणी!

Syndicate content