धम्माल अनुभव .....

गेल्या शुक्रवारी म्हणजे २४ डिसेंबरला केदार शिंदेचा 'ऑन डयुटी चोवीस तास' प्रदर्शित झाला. पुढच्या शुक्रवारी ३१ डिसेंबरला सचिनजींचा 'आयडियाची कल्पना' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. हे दोन्ही चित्रपट मोठया बॅनरचे आणि खूप अपेक्षा घेऊन येणारे चित्रपट आहेत. या दोन्ही सिनेमांमध्ये माझा खारीचा वाटा आहे. दोन्ही चित्रपटात मी स्पेशल अॅपरिअन्सचं गाणं केलं आहे.
केदार हा माझा खूप जवळचा चांगला मित्र आहे. आम्ही दोघांनी यापूर्वी एकत्र काम केलं नाही. या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही एकत्र काम केलंय. 'सैय्या है सनकी' हे एक आयटम साँग आहे. ते युहाना साबळेवर चित्रित करण्यात आलं आहे. आम्ही या गाण्यात धम्माल केलीय. या गाण्यात एक जो ताल आहे, जे बीट्स आहेत ते खूप धम्माल आहेत. एक टपोरी पोरगा जो की तिथे धम्माल करायला आलाय , असं टिपिकल मुंबैय्या गाणं आहे. मला असं वाटतं की केदारच्या प्रत्येक चित्रपटातील एक असं गाणं हिट होतचं हे गाणंही तेवढचं हिट व्हावं.
सचिनसरांच्या चित्रपटात एक लावणी आहे आणि त्यात मला सरांमुळे काम करायला मिळालं. ही लावणी भार्गवी चिरमुलेवर चित्रित करण्यात आली असून तिची त्यात प्रमुख भूमिका आहे. या दोन्ही गाण्यांमुळे मला दोन नवीन डान्स फॉर्म करता आले. हा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच त्यांनी मला सांगितलं होतं की एक गाणं आहे आणि त्यात तू असावसं. सचिनजी मला वडिलांच्या स्थानी आहेत. त्यांच्या कलाकृतीचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. त्यांच्या प्रत्येक कामात, चित्रपटात, टेलिव्हिजनमध्ये मी सहभागी असतो, हा त्यांचा आर्शिवाद आहे.
केदारबरोबर काम करण्याची एक वेगळी मजा आहे. हातात आणि डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणं ही माझी इमेज नाही आणि मी असं काम कधी केलं नाही. मूळात मला नाचायला खूप आवडतं. त्यामुळे या दोन्ही गाण्यांचे फॉर्म जरी वेगळे असले तरी मला काम करताना मजा आली. या गाण्यांचा मूड मी खूप एन्जॉय केला. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता की माझे दोन चित्रपट प्रदर्शित होतायेत ,माझा त्यात रोल नाही मात्र माझी गाणी त्यात आहेत. हे दोन्ही पिक्चर लोकांमध्ये ऑलरेडी हिट आहेत. त्यामुळे हा महिना माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे.
'ऑन डयुटी चोवीस तास' चित्रपटातील गाणं करताना तर मी दिवसभर शुटिंग करायचो आणि रात्री गाण्याचं शुटिंग करायचो, असं सलग दोन दिवस दोन रात्र काम केलं. मात्र त्या कामाची मजा इतकी होती की त्या कामाचा ताण मूळीच वाटला नाही. सचिनजींबरोबर गाण्याचं शुटिंग आम्ही पुण्याला तीन दिवस केलं. सरांसोबत काम करणं तर मोठं आहेच शिवाय तीन दिवस त्यांचा सहवास मिळणं खूप छान आहे. ऑन स्क्रीन ते जेवढे गंमतीशीर आणि मिष्कील आहेत त्याच्या दसपट ते ऑफ स्क्रीन आहेत. त्यामुळे तासभर जरी तुम्ही त्यांच्याबरोबर असाल तर तुमचं हसून पोट दुखतं. त्यांना खायचा आणि खाऊ घालण्याचा खूप शौक आहे. त्या तीन दिवसात आम्ही खूप वेगवेगळे पदार्थ खाल्ले.
आजवर मी जे काम केलंय त्यापेक्षा वेगळं काम, दोन मोठया मेकर्सचे चित्रपट आणि दोन गाणी. या कामाचा अनुभव फारच चांगला होता. या कलाकृतींमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. या गाण्यांमध्ये मी झोकून देऊन नाचलोय त्यामुळे मला वाटतं की लोकांना माझं काम नक्कीच आवडेल. या कामाचा रसिकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय, हे जाणून घेण्यासाठी मी जाम उत्सुक आहे.
- स्वप्नील जोशी चा ब्लॉग
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
hey swapnil nice to meet
hey swapnil nice to meet you.
mala tuze hey navin prayog pahayala nakki aavdel.
all the best for your future.
Very nice to connected with you
I am very happy to i am connected with you. with this i can share my exprience with you. Thank You!