न सुचलेल्या कवितेचं भूत
माझ्या न सुचलेल्या कवितेचं भूत रोज माझ्या मानगुटीवर बसतं
गोंधळलेल्या,काळ्या,अशांत,जीवघेण्या रात्री.
जेव्हा माझ्या अपुर्या स्वप्नांचे,अतृप्त वासनांचे,फसलेल्या यमकांचे,चुकलेल्या गणितांचे,अस्फुट चित्कारांचे घाव बसतात माझ्या मनावर.
जगण्याच्या चौकटी आखताना आपसूक बाजूला सारलेलं,
आत आत कुठेतरी दाबलेलं,
पचवलंय असं वाटलेलं,
नाकारलंय असं मानलेलं,
'उद्या पाहू' च्या सदरात मोडलेलं.
स्वप्नाळू वगैरे डोळ्यांना न झेपलेलं,
मोडक्या खांद्यांना नं पेललेल
पंख बांधून पदरात लपवलेलं.
साखरेत घोळून पोटात दडवलेलं,
माझं, तुझं, तिचं, त्याचं...
सगळं पिशाच्च्यासारख उभं ठाकतं समोर.
आणि म्हणतं, 'कविता तरी कर'
पण वांझ गायीसारखी मी मख्ख पहात राहते.
'कविता' नावाच्या याक्षिनिचा धावा करत,
'अजाण कवितेच्या वाटेला जाणाऱ्यांना' दरडावणाऱ्या आरतीप्रभूंचे नामस्मरण करत.
ट ला ट जोडणार्यांच्या नावाने बोटं मोडत,
मेघना पेठेच्या नागड्या, निर्भीड कवितेचा हेवा करत,
मर्ढेकर,कुसुमाग्रज,करंदीकरांचे पाय धरत.
मग स्वतःची समजूत काढते.
'तो फोर्म नाही माझा' असं म्हणत.
मग होते निद्रादेवीच्या आधीन.
सकाळी कोडगेपणाची शाल पांघरून आला दिवस सार्थकी लावते.
'मुलगी,मैत्रीण,बायको,प्रेयसी,आई' ....
सर्व भूमिकात अभिनयाची उंची गाठते.
आणि रोज रात्री त्या नं सुचलेल्या कवितेच्या भुताला बुद्धी नावाच्या मांत्रिकाकडे न्यायचं ठरवते.
पण ते मानगुटीवरून उतरेल तर नं??
- विभावरी चा ब्लॉग
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)







































Comments
न सुचलेल्या कवितेचं भूत
sdhya न सुचलेल्या कवितेचं भूत kay mhante aahe ?
AAVADLELA BHOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOT
तुमच्या न सुचलेल्या कवितेचं भूत रोज माझ्या मानगुटीवर बसतं
आणि मला विचारतं पुढच्या नव्या सुचलेल्या ओळी वाचल्या (वेचल्या) का ?
आता हे भूत मला आवडू लागले आहे मी त्याची रोज वात पहातो.
अभिनंदन आणि शुभेच्छा...!
kavita
hiiiiiiiiiiii
vibhavari khup chan lihte tu.
mala kharach khup awadle manapasun .
abhinayasobat tuze likahanhi khup khan ahe .
chalu thev asech lihne.
@shri jagtap
Apratim
vibhavari , apratim ahe ha blog, "ट ला ट जोडणार्यांच्या नावाने बोटं मोडत" hi upama tar apratim. aata ek kavita lihich, vaat pahato aamhi.
hi
hi vibhavri,
Tu asach lihat jav asach mala vatat
mag ti kavita aso kinva tuza blog
farach chhan lihtes
i m waiting your next movment ( blog or poem )
कवितेच भूत
प्रिय विभावरी ,
नमस्कार !!!!!!!!!!!!!!!
आपण आपल्या ब्लॉगवर लिहिलेली 'न सूचलेल्या कवितेच भूत' या विषयीच्या काव्यपंक्ती वाचून आपल्यातील कवयित्री कुठेतरी घुसमटल्यासारखी आणि दिशाहीन झाल्यासारखी वाटत आहे.
आपल्या मनात एकाच वेळी असंख्य विचारांचे काहूर झालेले आहे असे जाणवत आहे. पण आपली कविता पूर्ण करण्यासाठी असणारी धडपड वाखाणण्याजोगी आहे.
आपली कविता पूर्ण होण्याकरिता अनुकूल वस्तुस्थिती आपल्या सभोवताली तयार होवो ही माझ्याकडून आपणांस शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!!!!
अवधूत राणे
९८२१७७८८८४