पुन्हा एकदा मी,सिध्दू आणि केदार सर.

सोनाली कुलकर्णी's picture

ज्या केदार सरांनी 'बकुळा नामदेव घोटाळे'या चित्रपटाने मला या इंडस्ट्रीत लाँच केलं त्यांच्याच सोबत पुन्हा एकदा 'इरादा पक्का'हा चित्रपट करतांना खूप आनंद झाला.
'बकुळा नामदेव घोटाळे'च्या वेळेस मी अगदी कोरी पाटी होते.मला काहीही माहित नव्हतं. केदार सरांनी मला अक्षरशः बोट धरून चालायला शिकवलं.खरचं मनापासून सांगते ते माझे गुरु आहेत.
त्यांनी जेंव्हा मला पुन्हा एकदा त्यांच्या चित्रपटासाठी विचारलं तेंव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. केदार सरांनी आतापर्यंत त्यांच्या चित्रपटात कोणत्याही हिरोईनला रिपीट केलेलं नाही. पण माझ्याबाबतीत हे घडलं याचा मला खूप आनंद आहे.
'बकुळा' करणं जसं मला चॅलेंजीग होतं तशीच 'इरादा पक्का' मधली 'अद्या'(हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे)सुद्धा.ज्यात मझ्या अभिनयाला वाव असेल अशी व्यक्तिरेखा मला पदार्पणातच मिळाली.आणि आता 'इरादा पक्का'च्या रूपाने ही संधी मिळाली.
पुन्हा एकदा सिध्दू सोबत काम करतांना खूप मजा आली.'बकुळा...'आणि आता 'इरादा पक्का'मध्ये आम्ही नवरा बायको आहोत.शहरात राहणारे,नौकरी करणारे,नवरा बायको पेक्षा एकमेकांचे मित्र मैत्रीण असणारे,रोहित आणि अद्या तुम्हाला नक्की आवडतील.

Comments

hi sonalee, how are u? tuza

Indraja Bhakare's picture

hi sonalee, how are u?
tuza S..sasuch pahila. nehmipramanech mast dislis.
vishay vegla aslyamule pahtana maja aali.
yanantar tuze navin chitrapat konte?
tujhya navin cinemachi wat pahat aahe.

Irada Pakka

SUNIL MODAK's picture

Hay all the best Sonalee for this new movie of yours. Hope it does very well at box office. I will be seeing it
next Saturday.

all the best

sunil babanarao chavan's picture

keep it up
u r challenging girl
so accept the challenge and move ahed
all the best