अप्सरा आली

तुझे डोळे एखाद्या हरीणीसारखे,
तुझे दात मोत्यासारखे,
तुझे हसणे जणू फुलांचा वर्षाव,
तुझे बोलणे म्हणजे नाजूक हवेच्या झोक्यासारखे,
तुझे नाचणे म्हणजे खरच एखाद्या इंद्रपुरीतल्या अप्सरेसारखे.

म्हणुनच गुरु ठाकूर यान्चे "अप्सरा अली इंद्रपुरीतून खाली" हे तुला खरच शोभून दिसते. खुप खुप अभिनंदन नटरंग च्या सुंदर अभिनयासाठी

फॅन क्लब्ज:

Comments

साधी simple ... अप्सरा

महेश भोगल.'s picture

स्वर्गातील अप्सरेला भेटायला जायचं तर काय करावं लागेल, याची कल्पना करणेही शक्‍य नाही; पण पृथ्वीवरच्या 'अप्सरे'ला भेटताना कितीतरी कल्पना मनात होत्या. मोठा प्रशस्त बंगला, रखवालदार आत जाऊ देईल का, एखाद-दुसरा मोठा कुत्रा गुरगुरून स्वागत करेल का, असे प्रश्‍न घेऊनच या 'अप्सरे'च्या घराकडे निघालो. या साऱ्या प्रश्‍नांना आणि शंकांना सोनालीच्या सहजसुंदर हसण्याने उत्तर मिळाले आणि एकदम हायसे वाटून गेले.

हो! बरोबर तुम्ही समजताय तीच ती 'नटरंग' मधील अप्सरा! 'नटरंग'मधील भरजरी वेशभूषेतील अप्सरा प्रत्यक्षात तिच्याच भाषेत 'साधी सिंपल'च आहे. गजबजलेल्या वस्तीतील एका छोट्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे दार तिने हसतमुखाने उघडले आणि आत पडणारे पाऊल चकितच झाले. 'नटरंग'मधील नृत्याच्या अदांनी जगभरातील तमाम मराठी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही अप्सरा ती हीच, यावर क्षणभर विश्‍वास बसतच नव्हता.

पण साधा टॉप व जीन पॅंट असा घरगुती पेहराव ल्यालेली सोनाली बैठ्या सोफ्यावर रेलून बसली व तिने बोलायला सुरवात केली आणि कला, नृत्य, चित्रपट, अभिनयाशी संलग्न विविध गोष्टींबाबत ती भरभरून वाहत राहिली. प्रत्येक बाबतीतील तिची ठाम मते तिच्या कलागुणांशी सुसंगत अशीच उलगडत होती. मराठी चित्रसृष्टीतील एका उज्ज्वल भवितव्याची खात्रीच या बोलण्यातून मिळत होती.

'हे सारे म्हणजे 'नटरंग'पर्यंतचा प्रवास समजून-उमजून किंवा ठरवून नाही झाला. आपोआप होत गेले, आपण ठरवू तसे काही होत नाही, मनाप्रमाणे घडले तर ते चांगलेच, नाही घडले तरी ते त्यापेक्षाही चांगले. कारण ते घडणे परमेश्‍वराची इच्छा असते. ते अधिक चांगल्यासाठी होते,'' असे सुरवातीला सांगणारी सोनाली कुलकर्णी नंतर मात्र ""आता सर्वच गोष्टी ठरवून आणि विशिष्ट दिशेने करायच्या आहेत,'' असे सांगत होती. वयाच्या पाचव्या वर्षी ती नाच करू लागली, त्यावेळी हाच नाच तिच्या आयुष्यात वेगळे रंग भरणार आहे, हे तिच्या आईच्या लक्षात आले होते. सोसायटी, कॉलनीतील कार्यक्रमांत नाच करण्याबरोबर शाळेच्या वार्षिक महोत्सवात तिचे नृत्य लक्षवेधी ठरू लागले होते. आई पंजाबी आणि बाबा लष्करात डॉक्‍टर. बाबा नोकरीनिमित्ताने उत्तर भारतात.

आईबरोबर ती पुण्याच्या लष्करी परिसरातच मोठी झाली. लष्कराची इंग्रजी माध्यमाची शाळा. सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम. आपल्या मुलीने भरपूर अभ्यास करावा आणि डॉक्‍टर व्हावे, अशी बाबांची इच्छा. अभ्यास करतानाच एकीकडे नृत्याची आवड जपली होती. संधी मिळेल तेथे नाच सादर करण्याचे वेडच तिला लागले. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने तिच्या आईला सोनालीत "स्पार्क' असल्याचे सांगितले आणि मग आईने ते मनावर घेतले. "आईची जिद्द, तिची धडपड, तिच्या म्हणण्याप्रमाणे चालत राहिले. सर्व यश आईचेच आहे...'' सोनाली सांगत होती. "आजी-आजोबांमुळे मराठी समजत होते; पण लष्करी शिस्तीचे वातावरण, इंग्रजी शाळा, आई पंजाबी यामुळे मराठी बोलता येत नव्हते, असे ती आता सहजसुंदर मराठीत सांगत होती. नृत्य करावे, अभिनय करावा, असे लहानपणी त्या वयातील सर्वच मुला-मुलींना वाटते, त्याप्रमाणेच तिलाही वाटत होते. करिश्‍मा, माधुरी दीक्षित, काजोल, श्रीदेवी यांचे मनावर राज्य होते. श्रीदेवीचे लम्हे, चॉंदनी कितीतरी वेळा पाहिले.

अभिनयाचे त्या वेळी स्वप्न होते, ते शक्‍य नाही, कुठपर्यंत पूर्ण होऊ शकेल, याची माहिती नव्हती. त्यात 'कुलकर्णी खानदान की बेटी' असा शिक्का अधूनमधून दिसायचाच. अभ्यासाकडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते. 'साईड बाय साईड' नाच सुरू होता. नववीत असताना 'भरतनाट्यम्‌'चा क्‍लास सुरू केला. दहावीपर्यंत दीड वर्ष तसं प्राथमिक शिक्षणच झालं. दहावीत 88 टक्के मार्क पडले. सीबीएससी बोर्ड असल्याने पाच टक्के वाढले. "फर्ग्युसन'ला सायन्सला जायचे स्वप्न. गुणांमुळे आरामात प्रवेश मिळाला. डॉक्‍टर व्हायचे होते ना! त्या दोन्ही वर्षांत अभ्यास सुरूच राहिला; पण दुसऱ्या बाजूने वेळ मिळेल तसा नाच, नाचाच्या स्पर्धांत सहभाग. त्याचदरम्यान "ऑडिशन्स' देणे सुरू राहिले. सोनाली आईबरोबर एकदा "एफटीआय'ला गेली. एक डॉक्‍युमेंटरी मिळाली. ती केली. त्यावेळी आता अभिनय करायचा असे तिने ठरवले. "मॉडेलिंगचा नवा "पार्ट' सुरू झाला. नाच, अभिनय, मॉडेलिंग असा प्रत्येक दरवाजा ठोठावत होते. काहीच नाही, कोणी गॉडफादर नाही, कोणते तरी दार उघडेल, या आशेवर खटपट सुरू होती,'' असे ती सांगत होती. त्याच वेळी कॉलेजमधील मित्रांनी सांगितले, ""पुण्यात सौंदर्य स्पर्धा होतेय.'' भाग घेतला. आठपैकी पाच "सबटायटल्स' घेत "फर्स्ट रनर अप' ठरले. त्यावेळी तिचे वय होते 14 वर्षे!

त्यानंतर जाहिरातीचे क्षेत्र खुणावू लागले. प्रसाद ओकबरोबर 'रिलायन्स'ची पहिली ऍड केली, त्या वेळी प्रसाद तिला माहीतही नव्हता. ""एकूण त्यावेळी मराठीतील फार काहीच माहीत नव्हते. पिंजरा पाहिल्याने संध्या, नंतर अशोक सराफ, निळू फुले माहीत होते; पण बाकी कोणीच नव्हते,'' असे ती सांगते. त्यानंतर बऱ्याच "ऍड' केल्या. बारावीला 76 टक्के मार्क मिळाले. अभिनय की शिक्षण ? आता दोन्ही गोष्टी होऊ शकत नाहीत. एकाच विषयाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल, म्हणून या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय तिने घेतला. बाबांची नाराजी; पण आईचा पाठिंबा होताच. इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशनमध्ये पत्रकारिता आणि समूहसंवाद (जर्न्यालिझम अँड मास कम्युनिकेशन) पदवी अभ्याक्रमासाठी प्रवेश घेतला.

'ते सुरू असतानाच 2006 मध्ये ई टीव्हीच्या 'हा खेळ संचिताचा' या मालिकेसाठी ऑडिशन दिली. त्यावेळी "देवनागरी असले तरी मराठीचे स्क्रिप्टही मी नीट वाचू शकत नव्हते. विक्रम गोखले, इला भाटे, नसिरुद्दीन शहा अशा ज्येष्ठांबरोबर काम करण्याची संधी या मालिकेमुळे मिळाली,'' असे तिने सांगितले. त्याचदरम्यान जगदीश खेबुडकरांच्या "गौरी' नावाच्या चित्रपटाची ऑफर आली. तो केला; पण त्याचे पुढे काय झाले, ते समजले नाही. मग "गाढवाचं लग्न' आला. "साडे माडे तीन'साठी अंकुश चौधरीने बोलावले. ऑडिशन देऊन मुंबईहून परत पुण्यास यायला निघाले. रस्त्यातच अंकुशचा फोन आला. "केदार शिंदेला फोन कर, त्याला नवा चेहरा हवा आहे.' केदारला फोन केला. आर. के. स्टुडिओसमोरील रस्त्यावर केदारची भेट झाली. ती म्हणाली, "माझे मराठी आणि इतर सारे प्रश्‍न होतेच; पण केदारने माझ्या डोळ्यात काय पाहिले, माहीत नाही. "बकुळा नामदेव घोटाळे' मला मिळाला. त्या चित्रपटातील भूमिकेबद्दल सवोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मला पुरस्कार मिळाला आणि सर्वांना ही "दुसरी' सोनाली कुलकर्णी माहीत झाली. नंतर अडीच वर्षांत बारा चित्रपट केले.''

'नटरंग'मुळे वेगळाच अनुभव सध्या घेतेय. त्यानंतर 'ऑफर' येतायत. मात्र नवा चित्रपट घेतला नाही. आता जबाबदारी वाढली आहे. काय करायचे, काय नाही, हे आता ठरवावे लागेल,'' असे ती सांगते. सोनाली अजूनही कॉलेजमध्ये आहे. रेडिओ, टीव्ही अँड फिल्म विषयातील प्रॉडक्‍शनचा अभ्यासक्रम ती पूर्ण करतेय. "या क्षेत्रात स्थिरतेसाठी संघर्ष अपरिहार्य आहे; पण कोणालाही नावे न ठेवता तुम्ही काय करू शकता, हे तुमच्यावरच अवलंबून असते. तुम्ही आहात तसेच जग वाटते. समोरची व्यक्ती वाईटच आहे, असे गृहित धरून जाणे योग्य नाही. आपल्याला नेमके काय करायचे आहे आणि काय नाही, यात गोंधळ असेल तर काहीच जमत नाही. त्यामुळे काय करणार, याबाबत "फर्म' असणेच महत्त्वाचे ठरते.' असा सल्लाही ती नवोदितांना देते.

हिंदी, इंग्रजी, पंजाबी, काही प्रमाणात जर्मन आणि आता मराठी या भाषा सोनालीला येतात. तिला पंजाबी चित्रपटासाठीही "ऑफर' येत आहेत. "नटरंग'नंतर मराठीत तर खूपच! पण त्यात तमाशापटांसारखेच अधिक. तो शिक्का बसू नये, यासाठी चित्रपट निवडताना ती विचार करणार आहे. अगदी हिंदीतही "ऑफर' आहे. "इतक्‍या धांदलीत हिंदी चित्रपट स्वीकारणार नाही. कारण हिंदीत स्वतःला "प्रूव्ह' करणे महत्त्वाचे ठरते. येणारा पहिला चित्रपट, त्याचा विषय, आशय आणि माझे करिअर या सर्वाचा विचार करून ऑफरचा विचार करेन. कारण हिंदीत एकच चित्रपट झाला आणि नंतर काहीच नाही, असे होणे मला आवडणार नाही,'' असे ती ठामपणे सांगते. आवडता चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री असे एक काही नाही. अनेक आहेत. मराठीतील पिंजरा, हिंदीत स्मिता पाटीलचा भूमिका, कागज के फूल, गाईड, लम्हे, चांदनी, कुछ कुछ होता है, बॉलिवूडचे प्रीटी वूमन, नोटिंग हिल असे कितीतरी... अभिनेत्रींमध्ये श्रीदेवीपासून काजोलपर्यंत आणि अभिनेत्यांत "अमिताभ बच्चन जगात कोणाला आवडत नाही, असे होऊ शकेल का?' असे सांगत ती शाहरुख व आमीर दोघेही आवडतात, असे तिने सांगितले. खरे म्हणजे अभिनेता-अभिनेत्री कोण आहे, यापेक्षा चित्रपटात हृदयाला भिडणारी भूमिका निभावणारे सारेच कलावंत आवडतात,असे सांगत तिने ""शाहरुख खान तर खूपच. आता असे वाटते की, हिंदीत जायचेच; तर आपल्याला एक तरी चित्रपट शाहरुखबरोबर करायचाय!' असे मनापासून सांगितले.

*** सोनाली म्हणते...
"नाचाशिवाय जगूच शकत नाही. सोनालीला बघायचेय, नाचताना बघा, ती खरी सोनाली.''
"आवडी-निवडीचा फारसा आग्रह नाही. फिरण्यासाठी अमुक गाडीच हवी, असेही नाही किंवा खाण्या- जेवण्यात अमुकच हवे, असेही नाही. जे समोर येईल ते स्वीकारायचे. जगण्यास आवश्‍यक असतील तेवढ्या गरजा भागल्या की बास. मी अगदी साधी सिंपल आहे.''
"एक सुपरहिट सिनेमा म्हणजे ग्रेट असे म्हणण्यात अर्थ नाही. ते खरेही नाही. माझ्यापेक्षा खूप टॅलेन्ट अवतीभवती आहे. कला किंवा यशावर कोणाचाही अधिकार नाही, देवाच्या कृपेने माझ्याकडे कला आहे. मेहनत घेतली तरच यश मिळेल, याची जाणीव मला आहे. काय करायचे याचा निश्‍चित फोकस असायला हवा. समजून-उमजून केलेली भूमिका जिवंत राहावी, असेच काही तरी घडत गेले पाहिजे.''

ई-सकाळ मधिल श्रीकांत कात्रे लिखित लेख सोनलिच्या चाहत्यान साठि...........

अप्रतिम नृत्य

अनिल्'s picture

बकुला नामदेव घोटाले पाहिला तेव्हाच म्हणालो होतो....पोरगी पुढे झकास अभिनय करणार....पण खोट ठरल....कारण अभिनया बरोबर नृत्य पण एवढा झकास करेल अस नव्होतो म्हणालो....अप्रतिम दीदी...काय chance pe dance मारलाय तुम्ही....संधीच 100gm सोनं केल तुम्ही.....

मस्त आहे दन्स माला खुप आवदला.....भावि आयुश्यासाथ शुभेच्य

अन्नुकेन्'s picture

मस्त आहे दन्स माला खुप आवदला.....भावि आयुश्यासाथ शुभेच्य