'अ. भा. मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा' तर्फे गायक संगीतकार शंकर महादेवन यांना 'आशा भोसले पुरस्कार'
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे २००२ पासून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावे ‘आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारास आशाजींच्या वाढदिवशी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार जाहीर केला जातो. आज पर्यंत मा. लता मंगेशकर, खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहेरी , प्यारेलालजी , आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यंदाचे या विशेष पुरस्काराचे हे १० वे वर्ष असून, हा १० वा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक, संगीतकार श्री. शंकर महादेवन यांना जाहीर करताना परिषदेला आनंद होत आहे, असे परिषद अध्यक्ष श्री. भाऊसाहेब भोईर म्हणाले.
शंकर महादेवन यांचा चेन्नई येथे एका तमिळ कुटुंबात जन्म झाला. अगदी लहानपणापासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटकी संगीताचे शिक्षण त्यांनी घेण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी त्यांनी वीणा वाजविण्यास सुरुवात केली. आपले इलेक्ट्रोनिक्स, सोफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी आर.आय.पाटील टेक्निकल कॉलेज, नवी मुंबई येथून पूर्ण केले.
दक्षिणे कडील या गुणी कलाकाराची सांगीतिक कारगिर्द सुरु झाली जाहिरातीसाठीच्या हिंदी व दाक्षिणात्य ‘जिंगल्स’ने. संगीतकार ए.आर. रहेमान यांचे बरोबर ‘कान्दुकोन्दैन’ या गीतासाठी त्याना गायक म्हणून पहिले राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. ‘ब्रीथलेस’ या १९९८ मधील पहिल्या अल्बम नंतर शंकर महादेवन हे नाव घरा घरात पोहोचले.
एहसान आणि लॉय यांच्या साथीने ‘शंकर-एहसान-लॉय’ ही तीक्कल बॉलीवूड मध्ये आपला वैशिष्ठ्यपूर्ण संगीताने रसिकांच्या मनात अधिराज्य करीत आहे.
संगीताला सीमा नसते , ही उक्ती शंकर महादेवन यांच्या बाबतीत खरी ठरते. वेगवेगळ्या टीम्स बरोबर विविध प्रकारचे सांगीतिक काम करतानाच केवळ बॉलीवूड पुरताच मर्यादित न राहता मलयालम, तमिल, तेलगु, मराठी, गुजराथी, पंजाबी अशा अनेक भाषांत शंकर महादेवन यांनी गीते गायली.
आपले अनेक वर्षांचे स्वप्न ‘शंकर महादेवन अकादमी’ ही ऑन लाईन संगीत अकादमी सुरु करून त्यांनी पूर्ण केली. या द्वारे कोणत्याही संगीत प्रेमीस निष्णात संगीत शिक्षकाकडून शंकर महादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षण घेता येते.
नुकतेच म्हणजे २ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ संगीत तपस्वी श्री. श्रीनिवास खळे यांचे निधन झाले. शंकर महादेवन त्यांचे शिष्य आहेत. अजय-अतुल यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘एक द्न्ताय’ व ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही गाणी शंकर महादेवन यांनी लहान थोरांच्या ओठांवर रुळवली.
या पुरस्कार कार्यक्रमाची तारीख नंतर जाहीर केली जाईल.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































