आलटून पालटून नाटक....एक भन्नाट कॉमेडी

सर्व कलाकारांचा अतिशय देखणा अभिनय...सहजसुंदर अभिनयामुळे निखळ मनोरंजन करणारी एक उत्तम कलाकृती..दिग्दर्शक समीर विध्वांस यांचे अभिनंदन...नवा गाडी नवा राज्य नंतर अजून एक सुंदर नाटक..प्रसाद ओंक चा अभिनय वाखाणण्यासारखाच आहे, टीवी आणि फिम्स मधून विविध उत्तम भुमिका साकारल्या असल्या तरी ह्या नाटकातला त्यांचा अभिनय हा निर्विवादपणे सर्वोत्तम आहे..सुजाता जोशी आणि विकास पाटील यांचाही अभिनय अगदी सहज सुंदर आहे..मौसमी आणि ओमकार पाटील यांचेही काम लक्षवेधी आहे..सर्वांगसुंदर कलाकृती..