इलिया राजाचं संगीत आता मराठीत!

iliyaraja.jpg
मराठी चित्रपटांचं जागतिक चित्रपट महोत्सवातलं स्थान आणि महत्त्व लक्षात
घेता अनेक निर्माते,दिग्दर्शक आणि कलाकार मराठी चित्रपटांकडे वळताना दिसत
आहेत. त्यात आता संगीतकारांचीही भर पडणार आहे. बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये
प्रसिध्द असणारे इलिया राजा आता एका मराठी चित्रपटासाठी संगीत देणार
आहेत.
'हॅलो जयहिंद' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचं दिग्दर्शन गजेंद्र
अहिरे करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती तृप्ती भोईर करणार आहेत. या
प्रयत्नामुळे अनेक संगीतकार मराठी चित्रपटांकडे वळले तर त्यात नवल नाही.
इलिया राजा यांना आजवर 'पद्मभूषण पुरस्कार'आणि चार वेळा राष्ट्रीय
पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.