'उगवता तारा'- अमोघ तलाठी
आज मराठी चित्रपटसृष्टीत आशयपूर्ण आणि दमदार पटकथा असलेले मराठी चित्रपट येत आहेत. काही वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टी केवळ विनोदी चित्रपटांमध्ये अडकून पडली होती. आज मात्र ही परिस्थिती बदललेली दिसत आहे. मराठी साहित्यातल्या कथा कांदबर्यांचा आधार घेत चित्रपट तयार होत आहेत. या चित्रपटांना त्या विषयाला न्याय देणारी अनेक कलाकार मंडळी मराठी चित्रपटक्षेत्रात आहेत. त्यापैकी 'पारध', 'समुद्र' आणि 'गेम ओव्हर' या चित्रपटांमधून आपल्या समोर आलेला एक नवा चेहरा म्हणजे अमोघ तलाठी. त्याच्या करिअरची सुरुवातच दमदार चित्रपटांनी झाली. तगडे कलाकार आणि तेवढीच चांगली स्क्रिप्ट असणारे चित्रपट त्याने केले. आणि मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं. अशा संधीचं सोनं करणार्या अमोघ शी 'उगवते तारे'या सदराच्या निमित्ताने साधलेला संवाद.......
* विनोदी चित्रपटांकडून कलात्मक, गंभीर विषयांच्या निर्मितीकडे मराठी चित्रपट सृष्टीची वाटचाल सुरू आहे, हा बदल या क्षेत्रातील नव्या पिढीच्या दृष्टिनं पूरक आहे का?
- मला स्वतःला विनोदी चित्रपट बघायला आवडतात. कारण त्यातलं टाईमिंग एकदम जबरदस्त असतं. पण आपण १० चित्रपट विनोदी लागोपाठ जरी बघितले तरी एका ठिकाणी असं वाटतं की आता काहीतरी वेगळं हवं. त्यावेळी मात्र नवनवीन विषयांच्या चित्रपटांकडे प्रेक्षक वर्ग वळतो. आणि सध्या अशा चित्रपटांची गरज भासू लागली आहे. कारण आजचा ऑडियन्स हा विषयाच्या बाबतीत चिकित्सक झाला आहे. नव्या पिढीला असे विषय आवडत आहेत. त्यामुळे हा बदल नव्या पिढीच्या पथ्यावर पडला आहे.
* मराठी चित्रपटाप्रमाणे हिंदी चित्रपटात काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, याबाबत तुझं मत काय आहे?
- मला जर हिंदी चित्रपटात काम करायची संधी मिळाली तर जरूर मी त्या संधीचा विचार करेन. पण त्याचबरोबर माझा रोल त्याबाबत मी विचार करेन.तो रोल मला सुट व्हायला हवा हे ही तेवढंच महत्वाचं आहे.
* मराठी चित्रपटात आणि शाळेत असताना नकला, नाटक, एकपात्री प्रयोग केले आहेस, तुमची स्वतःची निर्मिती संस्था आहे, मग यातील कोणत्या क्षेत्राकडे तू करिअर म्हणून पाहतोस?
- माझ्या वडीलांची स्वतःची निर्मिती संस्था असल्याने निर्मिती तर नेहमी होतच रहाणार आहे. पण मला चित्रपटात करिअर करायची इच्छा आहे. चित्रपटात मी सध्या काम करतोच आहे. मला विनोदी नाटकात अभिनय करण्याची इच्छा आहे. नाटकात काम करताना जे टाईमिंग लागतं त्याची मजा काही औरच असते. काम बघून लोकांचा मिळणारा प्रतिसाद ते थ्रील मला अनुभवयाचं आहे.

* तुझे या क्षेत्रातील प्रेरणा स्थान कोण?
'अल पचिनो' हे माझ्यासाठी प्रेरणा स्थान आहेत. नक्कीच मला त्यांच्यासारखं होता येणार नाही पण तसं होण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
* सध्या तू कोणते प्रोजेक्ट करत आहेस?
- सध्या मी दोन प्रोजेक्ट करत आहेत. या वर्षाखेर ते चित्रपट प्रोसेसमधे असतील. या प्रोजोक्टबद्दल मी आशावादी आहे.
* आजवर तू अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर तू काम केले आहेस, तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता?
- सिध्दार्थ जाधव, मकरंद अनासपुरे ,विनय आपटे, डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत मी काम केलं आहे. या सगळयांकडून मला खूप काही शिकायला मिळालं. सिध्दार्थ जाधव आणि आम्ही हॉटेल ते शुटिंग सेटपर्यंत जाताना खूप धमाल करायचो. मस्त गाणी आम्ही टेपवर लावायचो आणि त्यावर नाचायचो. त्या काळात आम्ही खूप धमाल केली. सिध्दार्थ माझा चांगला मित्र झाला आहे. मकरंद अनासपुरे, विनय आपटे यांनी मला कधी मी नवखा असल्याचं जाणवू दिलं नाही. ते खूप मोठे कलावंत आहेत पण त्याची जाणीव त्यांनी मला कधी करून दिली नाही. अशा मोठया कलाकारांसोबत काम करायला मिळणं खूप मोठं आहे.
- शिल्पा भावे
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































