गुणी अभिनेता-दिग्दर्शक - आलोक राजवाडे
पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट, रंगभूमी मग ती व्यावसायिक असो किंवा प्रायोगिक करण्यासाठी फार पूरक संधी उपलब्ध नसायच्या. अर्थात समाजातही तेवढी पोषक परिस्थिती नव्हती. घरात आई-वडिलांकडून अभिनयासाठी,दिग्दर्शनासाठी फारशी मोकळीक नसायची. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. शाळेपासूनच मुलांच्या आवडी-निवडी, त्यांच्या करिअरसाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत सगळेचजण झटत असतात. या परिस्थितीमुळे अनेक कलाकार वयाच्या विशीतच विविध माध्यमांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी वावर करताना दिसून येतात. चित्रपटात किंवा रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शन असो या सर्व माध्यमांमध्ये कलाकारांमध्ये आघाडीचं नाव म्हणजे 'आलोक राजवाडे'.
'बोक्या सातबंडे', 'विहीर' (मराठी चित्रपट), 'उधे बून', 'घडाळयांचा दवाखाना' (शॉर्ट फिल्म), 'परका', 'झुम बराबर झुम', 'दळण', 'चारशे कोटी विसरभोळे', 'बेड के नीचे रेहनेवाली', 'रामप्रहर', 'अंधेर नगरी चौपट राजा', 'हु लेट द डॉग्स आऊट' (नाटक), 'इनसाईड आऊट', '२ शोर', 'इन्स्टिट्युट ऑफ पावटालॉजी', 'गेली एकवीस वर्ष', 'चक्र', 'तिची सतरा प्रकरणे'’ (दिग्दर्शन केलेली नाटके). रंगभूमी आणि चित्रपट, शॉर्ट फिल्म या सगळया कामात त्याचं वेगळेपण नेहमीच निश्चिर राहिलं. अशा या बहुगुणी कलाकाराशी 'उगवते तारे' या नव्या सदराच्या निमित्ताने साधलेला संवाद......
* हिंदी चित्रपटात काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, याविषयी तुझी काय कल्पना आहे?
- मी आज मराठी चित्रपट आणि रंगभूमीसाठी काम करतो आहे. माझ्या आवडीबरोबरच समाधानासाठी काम करतो. हिंदी चित्रपटातच काम करायचं आहे असं नाही. मी कुठल्या भाषेत काम करतोय हे महत्वाचं नाही तर ते काम माझ्या मनाला भिडणारं असायला हवं, असं जर काम असेल तर मी नक्की हिंदी चित्रपट करीन. पण तेच करायचं आहे असं मात्र नाही.
* या क्षेत्रात काम करायचं असं सुरूवातीपासून ठरवलं होतं का?
- मी लहानपणापासूनच शाळेच्या नाटकातून काम केली आहेत. नववीत असताना 'अब्राहम लिंकनचे पत्र' हे नाटक केले. त्यानंतर मग कॉलेजमधे ११वीला असताना 'सायकल' नावाच्या एकांकिकेसाठी आधी बॅकस्टेज केलं आणि मग त्याच एकांकितेत मला एक छोटा रोलही मिळाला. एकांकिकेसंदर्भात बोलायचं झाल्यास 'कळत' ही माझी पहिली एकांकिका आणि 'प्रलय' ह्या एकांकिकेत मी काम केले होते. या एकांकिकेची निवड 'फिरोदिया'मध्ये झाली होती. या एकांकिकेने आम्हाला यश मिळवून दिलं.
![]()
* या क्षेत्रात तू कोणाला प्रेरणास्थानी मानतोस?
- तसं निश्चित एकाचं नाव सांगता येणार नाही. मोहित टाकळकर, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, अतुल पेठे यांच्या बरोबर मी काम केले आहे आणि या प्रत्येकाकडूनच आम्हाला काहीना काही सतत चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
* आज नाटकांना प्रेक्षक मिळत नाही, अशी ओरड आपण अनेकदा ऐकतो त्याविषयी तू काय सांगशील?
- मला स्वतःला या रंगभूमीवर काम करायला आवडतं. मला इथे काम करताना आनंद मिळतो. त्यामुळे मी रंगभूमीवर काम करतो त्याचं दुःख किंवा कमीपणा वाटतं नाही. आणि मला नाही वाटतं की रंगभूमीची अशी काही परिस्थिती वाईट आहे. उलट खूप नवनवीन विषयांवरील नाटके सध्या येत आहेत. आणि ती चांगली गाजतही आहेत. त्यामुळे नाटकात काम करताना मला माझ्या कामाचं पूर्ण समाधान मिळतं.
* विनोदी चित्रपटांकडून कलात्मक, गंभीर विषयांच्या निर्मितीकडे मराठी चित्रपट सृष्टीची वाटचाल सध्या सुरू आहे, हा बदल या क्षेत्रातील नव्या पिढीच्या दृष्टिने पूरक आहे का?
- एक महत्त्वाचं की कलात्मक आणि गंभीर विषयांवरील कलानिर्मिती व्हायला हवी. तसचं सर्वच विषयांवरील कलानिर्मिती झाली पाहिजे. एखाद्या विषयाची कलानिर्मिती होणे ही प्रत्येकाची आवड आहे. जी काही निर्मिती तो करतो ती त्याच्या विचारक्षमतेप्रमाणे करतो. उलट मी तर असं म्हणेन की विविध विषयांवरील ही कलानिर्मिती पाहण्याची प्रेक्षकांनी तयारी दाखवली पाहिजे. आणि आवर्जून ते काम लोकांनी आर्वजून पाहायला हवं. कारण ते विषय मनापासून आलेले, मांडलेले असतात. त्यामुळे सगळेच विषय हाताळले जात असतील तर एका कलाकाराच्या दृष्टिनं ते पूरकच असतं.
* तुम्ही चित्रपट, शॉर्ट फिल्म, नाटकं, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात काम केले, यातील कोणत्या क्षेत्राकडे तू करिअर म्हणून पाहतोस?
- मला अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही गोष्टी करायला आवडतील. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. कारण जेव्हा आपण दिग्दर्शन करायला लागतो तेव्हा आपल्याला कलाकार म्हणून काम केलेले असल्याने त्या दृष्टिने येणार्या अडचणींवर मात करता येते. आणि जेव्हा आपण अभिनेता असतो तेव्हा आपल्याला कळायला सोपं जातं की नेमकं दिग्दर्शकाला काय हवयं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मला सतत करायला आवडतील.
* तू अनेक नाटक आणि चित्रपटात भूमिका केल्या आहेस तसचं दिग्दर्शक म्हणून काम करतोस तुला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल?
- अभिनय आणि दिग्दर्शन या दोघांची स्वतःची अशी मजा आहे. मला दोन्ही करायला आवडतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मला बरोबरीने करायला आवडतात आणि दोन्ही करायला आवडतील.
* मोठमोठया कलाकारांबरोबर तू काम केले तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता?
- दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, शुभांगी गोखले, सुलभा देशपांडे, ज्योती सुभाष, मोहन आगाशे असे हे सर्व कलाकार त्यांच्या कर्तृत्त्वाने आणि अनुभवाने इतके मोठे आहेत की त्यांच्याबरोबर काम करताना मला कधीच दडपण आलं नाही. उलट त्यांनी मला नेहमी समजून घेतलं. ही माणसं माणूस म्हणून खूप मोठी आहेत. त्यांचा त्यांच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून त्यांची कामावरची श्रध्दा, अभ्यासूवृत्ती पाहून मला खूप काही शिकायला मिळालं. अभिनयाबद्दलची त्यांच्या ठिकाणची मूळं अगदी पक्की आहेत. ती खोलवर रुतलेली आहेत.
* चित्रपटात काम करण्यासाठी रंगभूमीवर आधी काम करण्याची गरज असते का? तुला काय वाटतं?
- गरज असतेच असं काही नाही. कारण दोन्ही माध्यमं वेगळी आहेत. पण जर का आपण आधी रंगभूमीवर काम केलं तर फायदा नक्की होतो. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.
यापुढील आलोकच्या कामात त्याला यश मिळो!ही 'मम टीमकडून'शुभेच्छा..
- शिल्पा भावे.
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































