ज्योतीने तेजाची आरती..

ज्योतीने तेजाची आरती..

राम राम,

माझ्याकडे काही दुर्मिळ चित्रसंग्रह आहे, त्यातला हा फोटू. कुणी कुणी दिलेली, कधी कुणाकडे मी मागितलेली. मग कधी ललीमावशी, तर कधी वत्सलाकाकू, तर कधी गजाननबुवांच्या घरातून, तर कधी कुणी जुनाजाणता रसिक.. अश्या अनेकांकडून काही जुनी चित्र हाती आली, पाहायला मिळाली.

आजचं हे चित्र म्हणजे 'ज्योतीने तेजाची आरती..' म्हणावं असं...

बाबूजी गजाननबुवा जोश्यांच्या पाया पडत आहेत तो हा क्षण...!

आमच्या गजाननबुवांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर गायकीवर हुकुमत असलेले गजाननबुवा अनेकांचे श्रद्धास्थान होते तसेच बाबूजींचेही होते. स्वत: बाबूजींनाही ग्वाल्हेर घराण्याची उत्तम तालीम मिळालेली पं वामनबुवा पाध्यांकडून. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे बुजुर्ग गजाननबुवा हे बाबूजींचे अगदी आदरस्थान..!

हल्लीच्या 'समस'चा जोगवा मागत फिरणार्‍या काही कलाकारांच्या पिढीला या फोटोची महती कितपत कळेल याबद्दल मी साशंक आहे. असो, तूर्तास वाद नको..

आपला,
(ग्वाल्हेर गायकीचा प्रेमी, गजाननबुवांच्या परंपरेचा प्रेमी) तात्या.