डॉक्टर अभिनेता - निलेश साबळे
अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी इतर क्षेत्रात काम करणारी अनेक कलाकार मंडळी पुन्हा अभिनयाकडे वळतात. आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करतात. या कलाकारांमध्ये अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि उच्चपदस्थ अधिकार्यांचा समावेश आहे. डॉ.श्रीराम लागू, डॉ.गिरीश ओक,डॉ.अमोल कोल्हे यांच्याबरोबरच आता निलेश साबळेचंही नाव यापंक्तीत घेता येईल.
'हसा आणि लठ्ठ व्हा' हे ध्येय जणू डोळयासमोर ठेवून पुढची आपल्या करिअरची घोडदौड करायला निघालेला, शब्दफेकीच्या अदाकारीने सर्वांना खळखळून हसवणारा, 'नान्याच्या गावाला जाऊया' या मालिकेतून आपल्याला पहिल्यांदा हसवायला आलेला. आणि आपल्या बहुढंगी गुणांचे सादरीकरण करीत 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' विजेता झालेला कलाकार म्हणजे निलेश साबळे. 'फू बाई फू' या कार्यक्रमाच्या दोन पर्वांचे निवेदन करण्याचे भाग्य त्याला लाभले. आणि सुपर स्टार'निलेश साबळे'म्हणून तो लोकप्रिय झाला. अशा या कलाकाराची पुढील प्रवासाची दिशा जाणून घेण्याच्या निमित्ताने 'उगवते तारे' या सदरासाठी मारलेल्या गप्पा.....
* अभिनयाच्या क्षेत्रात मिळालेली पहिली संधी कोणती?
- मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण तशी मोठी संधी मला मिळाली नाही. आमचा कॉलेजमधेही नाटकाचा असा काही ग्रुपही जमला नाही. त्यामुळे इच्छा असूनही मी अभिनय करु शकलो नाही. पण मी कोल्हापुरला शिकायला होतो. तिथे मी स्वत:चे एकपात्री प्रयोग सुरू केले. त्या प्रयोगांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मी जवळ जवळ त्याचे २०० ते ३०० प्रयोग केले. आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की माझ्या बोलण्याने लोक हसत आहेत. मी जे करतोय ते योग्य दिशेने जात आहे. मग मी मुंबईला जायचं ठरवलं. मी एका ठिकाणी नोकरीला लागलो. त्या दरम्यान मला गिरीश मोहिते भेटले. त्यांनी मला आश्वासन दिलं की मला कधी तुझ्यासाठी काम मिळालं तर मी नक्की तुला बोलवीन. आणि त्याप्रमाणे मला त्यांनी पहिली संधी दिली ती 'नान्याच्या गावाला जाऊ या'मालिकेत. या मालिकेमुळे मला अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करता आला.
* तुझे या क्षेत्रातील प्रेरणा स्थान कोण आहेत?
- मला नेहमीच 'लक्ष्मीकांत बेर्डें' कडून प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे काम बघतच मी शिकलो. त्यांच्या कामातून मला नव्या गोष्टीं करण्याच्या कल्पना सूचतात.

* मराठीत एकपात्री, मालिका आणि रिअॅलिटी शो मधे तू काम करत आहेस, मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते याबाबत तुझ्या कल्पना काय आहेत ?
-
हो नक्कीच. मालिकांमूळे जरी मी लोकांना कळलो असलो तरी चित्रपटातील माझ्या भूमिकेने मी अनेक लोकांपर्यंत पोहचणार आहे. मराठी म्हणून इथे मला जगायला, राहायला आवडेलचं. मराठी चित्रपटामुळे मी अख्या महाराष्ट्राला कळेन. पण जर मला हिंदी चित्रपटात काम करायची संधी मिळाली तर मी भारतात आणि भारताबाहेर जिथे माझा चित्रपट पाहिला जाईल तिथे तिथे मी पोहचू शकेन. ज्यांना मराठी येत नाही त्यांना ही माझं काम पाहता, ओळखता, आजमावता येईल. त्यामुळे कुठलीही भाषा असली तरी माझं काम लोकांना कळावं हा या मागे हेतू आहे.
* तू आत्तापर्यंत विनोदी कामं केली आहेस, तूला गंभीर किंवा रोमॅन्टिक काम मिळाले तर तुला ती भूमिका करायला आवडेल का?
- निश्चितचं मला अशा भूमिका करायला आवडतील. आणि अशा भूमिकेत लोक मला स्विकारतात की नाही हे ही जाणून घ्यायला आवडेल. एकाच प्रकारच्या भूमिका मी करणार नाही.
* तू मराठीत एकपात्री, मालिका आणि रिअॅलिटी शो अशा विविध क्षेत्रात काम केले आहेस, यापैकी कोणत्या माध्यमात तुला करिअर करायला आवडेल?
- मला अभिनय करायला आवडेल. कारण अभिनयाला कोणत्याही भाषेचा अडथळा नसतो. आपल्या जे मनातून येतं ते लोकांना आवडतं आणि रुचतं देखील. त्यात विशेष म्हणजे भाषेचा अडथळा यायचं कारण नसतं. त्यामुळे सगळयाच्या मुळाशी तो अभिनय आहे.
* विनोदी चित्रपटांकडून कलात्मक, गंभीर विषयांच्या निर्मितीकडे मराठी चित्रपट सृष्टीची वाटचाल सध्या सुरू आहे, हा बदल या क्षेत्रातील नव्या पिढीच्या दृष्टीने पूरक आहे का?
- हो नक्कीच हा बदल पूरक आहे. महाराष्ट्राचा सुपर स्टारच्या अंतिम फेरीत निवडली गेलेली जवळ जवळ आम्ही बरीच मुलं कुठेना कुठे मुख्य भूमिकेत दिसत आहोत. रोज नवा अभिनेता तसाच रोज नवा दिग्दर्शक ही या क्षेत्रात येत आहे. त्यामुळे नव्या पिढीला त्यांच्या निर्मितीच्या विषयाला अनुसरुन नव्या पिढीतील प्रत्येकाला काम मिळत आहे. आणि प्रत्येकाच्या विविध कलागुणांना वाव मिळत आहे.

* अभिनय की डॉक्टरी यापैकी कोणत्या क्षेत्राकडे तू करिअर करायचे म्हणून पाहतोस?
- मला दिग्दर्शन करायला आवडेल. पुढे मागे कधी तरी मला या दिग्दर्शन क्षेत्रात काम करायचे आहे. अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही मला रस आहे.
* सध्या तू कोणते प्रोजेक्ट करत आहेस?
- दोन महिन्यापासून मी 'होम मिनिस्टर' करत आहे. आणि महेश कोठारेंचा 'दुभंग' हा चित्रपट करत आहे. होम मिनीस्टरमुळे फिरायला खूप लागतं त्यामुळे सध्या मला चित्रपट करण सोयीचं आहे कारण चित्रपटासाठी सलग पाचच दिवस द्यावे लागतात. तर मालिकेसाठी १२ दिवस सलग शुटींग असतं. पण एखादी चांगली संधी मिळाली तर मी मालिकेतही काम करेन.
* मोठमोठ्या कलाकारांबरोबर तू काम केले तेव्हाचा तुझा अनुभव किंवा एखादा आठवणीत रहाणारा मजेशीर किस्सा सांगशील का?
- 'फू बाई फू'च्या शुटिंगचा पहिलाच दिवस निर्मिती सावंत आणि स्वप्नील जोशी माझ्या समोर होते. तिथे सर्वच स्टार होते. त्यातुलनेत मी अगदीच नवखा होतो पण म्हणून मला कोणी तशी वागणूक दिली नाही. सर्वांनी खूप जवळ केलं, शिकवलं. त्यावेळी माझा प्रॉब्लेम एकच व्हायचा स्क्रिप्ट कितीही मोठी असली तरी मला कॅमेरात बोलायला काहीच प्रश्न नसायचा पण जर का मधे कोणी असं कर, तसं कर म्हणून थांबवलं तर मात्र मी पुढचं बोलायच्या बदली मी पुन्हा आधीचं तेच तेच बोलायचो. आणि मग निर्मितीताई कधी मुद्दाम मला याबाबतीत सुधारायला मला बोलता बोलता थांबवायच्या. आणि मग माझी फजिती ठरलेली असायची.
महेश मांजरेकरांनी मला चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यादरम्यान एका मिटींगला बोलावलं आणि मी गुपचूप त्या मिटींग रुममधे कोपर्यात बसलो होतो. त्यांनी मला पाहताच क्षणी मला हाक मारून एवढ्या ३० ते ३५ लोकांना माझी ओळख करुन दिली. सिध्दार्थ जाधव, महेश कोठारे यांनी सुध्दा मला मैत्रिच्या नात्याने खूप जवळ केलं, असे कामादरम्यान अनेक किस्से आहेत. जे माझ्या नेहमीच स्मरणात राहिले आहेत.
- शिल्पा भावे
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































