'प्लॅटफॉर्म'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटात आज अनेक महत्त्वाचे विषय हाताळले जात आहेत. अशाच एका महत्वाच्या विषयावर आधारित असलेला 'प्लॅटफॉर्म'हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. वीणा लोकूर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी 'मिशन चॅम्पिअन'या चित्रपटाची निर्मिती केली होती. 'स्त्रीभ्रुण हत्या'विषयावर हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात वीणा लोकूर यांची मुलगी सई लोकूर, आस्ताद काळे, शरद पोंक्षे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मुंबई आणि पुण्यात हा चित्रपट १५ जुलैला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट 'आशियाई चित्रपट महोत्सव'आणि 'मामि चित्रपट महोत्सवात'दाखवण्यात आला आहे. तिथे या चित्रपटाने रसिकांची वाहवा मिळवली आहे.