'मस्तानीची' प्रचिती - प्रचिती म्हात्रे
महाराष्ट्राला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपट , मालिका आणि रंगभूमीवर अनेक विषय हाताळले गेले. हे विषय लोकांच्या जिव्हाळयाचे असल्यामुळे लोक बारकाईने मालिका किंवा चित्रपट पाहतात. त्या माध्यमामध्ये काम करणार्या व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने जिवंत कराव्या लागतात. यामध्ये दिग्दर्शक आणि कलाकरांची कसोटी लागते. नुकतीच संपलेली आणि लोकप्रिय असणारी ई टीव्हीवरील मालिका 'बाजीराव मस्तानी' ही या ऐतिहासिक मालिकांपैकी एक महत्वाची मालिका.
बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकहाणी मालिकेतून जिवंत करणारी मस्तानीची भूमिका साकारणारी प्रचिती म्हात्रे आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एका मालिकेतूनच तिला आज अनेक चांगल्या कामाच्या ऑफर्स मिळत आहेत. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या बहुचर्चित 'बालगंधर्व'या चित्रपटात तिने काम केले आहे. मराठी मनोरंजनने 'उगवते तारे' या सदरासाठी तिच्याशी संवाद साधला ......
* या क्षेत्रात तुझा प्रवास कसा सुरू झाला ? सुरूवातीपासूनच अभिनयात करिअर करायचे असे तू ठरवले होते का ?
- 'एज्युकेशन हे माझं प्रोफेशन आहे तर अॅक्टिंग हे माझं पॅशन आहे. लहानपणापासून मला या क्षेत्राची आवड होती. शाळेत असताना मी अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचे. कॉलेजला गेल्यावर मी विचार केला की शिक्षण आधी पूर्ण करावं. त्याप्रमाणे शिक्षण पूर्ण केलं आणि चांगली नोकरीही मिळाली. आणि त्यानंतर माझं लग्न झालं, तरी माझ्या डोक्यात अभिनयाची आवड अद्याप तशीच होती. माझ्या सासर्यांची स्वतःची शाळा आहे. त्यामुळे या शाळेत काम करण्याचं मी मनापासून ठरवलं.
पण माझ्या सासरच्यांना जेव्हा माझ्या आवडीबद्दल कळलं तेव्हा ते म्हणाले की
तुला जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर तू नक्की विचार कर आणि त्याप्रमाणे पुढची पावलं उचल. याच कालावधीत नितीन चंद्रकांत देसाईंच्या नवीन मालिकेसाठी ऑडीशन सुरू होत्या. सहज प्रयत्न करून पाहावा म्हणून मी ती ऑडीशन दिली. आणि या भूमिकेसाठी माझी निवड झाली.

* अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी तुझं कार्यक्षेत्र वेगळं होतं असं तू म्हणालीस ,त्याबद्दल काय सांगशील ?
- माझा मानसशास्त्र हा आवडीचा विषय. मी एन.एम.आय.एम.एस.मधून मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं. आता 'बाजीराव मस्तानी'मालिकेमुळे मला अभिनयाची संधी मिळाली. शाळेमध्ये काम करताना असो किंवा आता मालिका-चित्रपटांमध्ये काम करणं असो या दोन्ही क्षेत्रांत मला माझ्या शिक्षणाचा फायदा होतो.
* इतिहासात 'मस्तानी' ही व्यक्तिरेखा अजरामर आहे, कारकीर्दीच्या सुरूवातीला अशी भूमिका मिळणं खरचं खूप मोठी गोष्ट आहे, याबद्दल तुला काय वाटतं ?
- 'मस्तानीची' व्यक्तिरेखा साकारायला मिळणं खरचं खूप मोठी गोष्ट आहे. अनेक कलाकार त्यासाठी वाट पाहत असतात. मला हा रोल मिळाला म्हणून मी जाम खूश होते. पण त्याचबरोबर भूमिकेला साजेसं माझं काम होणं गरजेचं होतं. त्यासाठी 'मस्तानीबद्दल' मला जेवढं काही वाचायला मिळेल तेवढं मी वाचलं. त्याचा बारकाईने अभ्यास केला. या अभ्यासासाठी मालिकेच्या लेखकांचं खूप सहकार्य मला मिळालं. तसेच नितीन देसाईनीं जे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत त्यांनी सुध्द खूप मदत केली. प्रेक्षकांनी मला 'मस्तानी' म्हणून स्विकारावं त्यासाठी मी मन लावून काम केलं.
मी जेव्हा 'मस्तानी'बद्दल लिखाण वाचलं तेव्हाची तिची झालेली अस्वस्थ मनस्थिती, समाजावरचा जातीचा पगडा, तिला नाकारणारा तत्कालिन समाज या सर्व गोष्टींचा विचार करुन मी मस्तानी साकारायचा मनापासून प्रयत्न केला.
* यापूर्वी अश्विनी भावे यांनी 'मस्तानी'ची व्यक्तिरेखा साकारली होती, त्यामुळे तुझ्या कामाची तुलना होणारच या विचाराचं दडपण आलं का ?
- ही भूमिका करताना दडपण आलं नाही. मला अश्विनी भावेंबद्दल आदर आहे. त्यांनी साकारलेली भूमिका लोकांना आवडली होती. 'मस्तानीची'भूमिका करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, असं मला मनापासून वाटतं.
* बाजीराव मस्तानी'मालिकेच्या शुटिंग दरम्यान काम करताना तुला आठवणीत असलेला गमतीशीर अनुभव सांगशील?
- खरं तर ही मालिका माझ्यासाठी खूप आठवणीत राहणारी होती. या मालिकेत बरेचदा घोडयांबरोबर शुटिंग करावं लागे. जसं माणसांबरोबर आपली केमिस्ट्री जमावी लागते. तशीच प्राण्यांबरोबर देखील ती जमावी लागते. त्यांचा मूड सांभाळून काम करावं लागतं. अनेकदा शुटिंग करताना मी घोडयावरून पडले आहे.
* मालिकेबरोबरच तू जाहिराती आणि चित्रपटामध्ये काम करत आहेस, या माध्यमांपैकी तू कशाची निवड करणार आहेस ?
- मला ही तिन्ही माध्यमं तितकीच महत्वाची वाटतात. याबाबतीत मी असं काही ठरवलं नाही. मला एखादा रोल आवडला तर मी तो नक्की करेन. मला वाटतं त्यासाठी माध्यमाची अडचण ठेवणार नाही. या माध्यमांबरोबर रंगभूमीवर काम करण्यासाठी निराळचं कसब लागतं. ते टाईमिंग पकडण्याचं जे कसब आहे त्यासाठी उच्च दर्जाचा अभिनय तुम्हाला यायला हवा. अजून या क्षेत्रात मी लहान आहे. मी अनेक गोष्टी शिकते आहे. नक्कीच मला या माध्यमात काम करायला आवडेल.
* या माध्यमांपैकी कोणत्या क्षेत्रात करिअर करायला तुला आवडेल ?
- सध्या तरी मी अशा ठराविक गोष्टी ठरवल्या नाहीत. चित्रपट आणि जाहिरातींमध्ये मी सध्या व्यस्त आहे. याव्यतिरिक्त मी आमच्या शाळेचं काम पाहत असते. मालिकेसाठी मात्र सलग बारा दिवस शुटिंग शेडयुल असतं. त्यामुळे तेवढा वेळ द्यावा लागतो. असं केलं नाही तर मग तारेवरची कसरत करावी लागेल. म्हणून मग चित्रपट आणि जाहिराती करण सोप आहे असं मला आता तरी वाटतयं.

* तुझे या क्षेत्रातील प्रेरणा स्थान कोण आहेत?
- बर्याच जणांकडून मला प्रेरणा मिळतच असते. पण 'माधुरी दिक्षीत, आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या कडून मला नेहमी प्रेरणा मिळत असते. ते ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करतात अभ्यास करतात. ते पात्र, त्याची मानसिकता समजून, उमजून मग ते साकारतात. त्यामुळे कोणतीही भूमिका ते अतिशय उत्तम रितीने सादर करतात. ही त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती प्रत्येक कलाकाराने डोळयासमोर ठेवून कलाकृती सादर केली पाहिजे. म्हणजे तो पात्र अभिनय खरा आणि सहज वाटेल. मला वाटतं असाच प्रयत्न मी 'मस्तानी'च्या भूमिकेसाठी केला आहे.
* विनोदी चित्रपटांकडून कलात्मक, गंभीर विषयांच्या निर्मितीकडे मराठी चित्रपट सृष्टीची वाटचाल सध्या सुरू आहे, हा बदल या क्षेत्रातील नव्या पिढीच्या दृष्टीने पूरक आहे का?
- हा खूपच चांगला बदल आहे. आपल्याला वाटतं की कॉमेडी करणं खूप सोपं आहे मात्र प्रत्यक्षात ती करायला खूप कठीण असते. आज मराठी चित्रपटात अनेक चांगल्या दर्जेदार विषय हाताळले जात आहेत. त्यामुळं या सकारात्मक बदलाचा फायदा आमच्यासारख्या कलाकारांना नक्कीच होतो.
मालिका,चित्रपट,जाहिराती आणि स्वतःची शाळा सांभाळून प्रचिती मनपूर्वक काम करण्याचा प्रयत्न करते आहे. तिच्या कामात तिला भरभरून यश मिळो ही 'मम टीम'कडून शुभेच्छा!
- शिल्पा भावे
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































