माझी शाळा - प्रिया बापट

“मुन्नाभाई…”सारख्या गाजलेल्या हिंदी फिल्म्स आणि “शुभंकरोती”सारख्या सिरीयलमधून परिचित असलेली बहुगुणी अभिनेत्री प्रिया बापट शेअर करतेय तिच्या शाळेतल्या गमती-जमती आणि फजितीसुद्धा....वाचा तिच्याच शब्दांत...
priya.jpgमाझं शिक्षण शिवाजी पार्कच्या बालमोहन शाळेत झालं. आणि अगदी खरं सांगायचं झालं
तर मी शाळा, कॉलेजलाईफपेक्षा खूप जास्त एन्जॉय केली. शाळेतला प्रत्येक क्षण माझ्या मनात अजूनही ताजा आहे. शाळेनं खूप काही दिलं. शाळेशी जोडलेल्या आनंदी आठवणींना उजाळा द्यायचा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती आंतरशालेय हिंदी नाट्यस्पर्धेत मिळवलेली बेस्ट अ‍ॅक्टरची ट्रॉफी जी माझ्यासाठी एकदम अनपेक्षित होती. अभिनयाची पहिले धडे गिरवले ते शाळेतच...नाटकाच्या रिहर्सलच्या नावाखाली तर मी जाम धमाल केली. रिहर्सलचं कारण सांगून आमचा ग्रुप तासाला बसायचा नाही...आणि रिहर्सल व्हायची ती बाहेरभटकण्याचीच. पण हां...अभ्यास कधी हेळसांड केली नाही.

शाळेतली एक गंमत तुमच्याशी शेअर केल्याशिवाय राहवत नाही म्हणून सांगते, की सातवीत असताना चाचणी परीक्षेत इतिहासाचा पेपर होता, तेव्हा अस्मादिक चक्क विज्ञानाचा अभ्यास करुन गेल्या होत्या...पास झाले मी...पण, तेव्हाची परिस्थिती आठवली की अशक्य हसू येतं.

शाळेबाबतची सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्या शाळेवर माझं अफाट प्रेम आहे त्या शाळेने केलेला सत्कार...अभिनयाने नाव- प्रसिद्धी मिळवून दिल्यावर शाळेने चक्क एक समारंभ आयोजित करुन त्यात मला प्रमुख पाहुण्याचा मान दिला.. त्या अनुभवाबद्दल योग्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे माझ्यासाठी. त्या समारंभात मला अर्थात बोलण्याची संधीही मिळाली होती. इट्स
अ रियल प्रेशियस अँड प्राऊड मोंमेट फॉर मी. शाळेच्या अशा न संपणा-या आठवणी आहेत.

फॅन क्लब्ज:

Comments

इतिहास

मकरंद गुलाबराव देशमुख's picture

शालेबद्दल चा अभीमान खरच खुप छान आहे.
तू जशी इतिहास च्या पेपर ला विदन्यानाचा अभ्यास केला होता त्याच्या विरुध माझे आहे.
मी विद्न्यान आणि गणित च्या पेपर ला इतिहास चा अभ्यास करायचो, अगदी दहावी बोर्ड ला सुधा. कारण इतिहास खुप डेंजर आहे ना.....
शाला जशी आपल्यासाठी खुप कही करते, तसेच प्रत्येकाने शालेसाठी ही काहीतरी केले पाहिजे बरोबर ना....