'रिंग रिंग रिंगा' नाटकाचा पहिला प्रयोग

'रिंग रिंग रिंगा' नाटकाचा पहिला प्रयोग
आज मराठी रंगभूमीला आणि चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. नवनवीन प्रयोग आणि उत्तम कथा, आशयघनता असलेले चित्रपट, नाटक रसिकांना पाहायला मिळत आहे. 'आशा मीडिया अँड आणि क्रिएशन्स 'ही नवी नाटयसंस्था मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. ही नवीन नाटयसंस्था 'रिंग रिंग रिंगा' हे नाटक घेऊन येत आहे.
'चाची४२०', 'हिंदूस्थानी' आणि आता नुकताच प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चनची भूमिका असलेला 'पा' चित्रपटाचे गेटअप तयार करणारे विक्रम गायकवाड यांनी नाटाकातल्या स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखांसाठी मास्कसह गेटअप तयार केले आहेत. हे या नाटकाचं मुख्य आकर्षण असणार आहे. मराठी रंगभूमीवर केला जाणारा हा पहिलाच प्रयोग असल्याचं दिग्दर्शक आणि प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे जितेंद्र बर्डे यांनी सांगितलं. या नाटकात सुनील गोडबोले, राजश्री आठवले, मोनिका दबडे, गणेश माने यांच्या भूमिका आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर येथे ३ जून रोजी रात्री नऊ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग होणार आहे.