‘ओन ड्युटी २४ तास’ साठी मिनल बाळ बरोबर केलेली खास बातचीत
स्टार माझावरील “गोविंदा रे गोपाळा” ह्या कार्यक्रमामधील राणी म्हणजेच मिनल बाळ ही केदार शिंदे दिग्दर्शित “ऑन ड्युटी २४ तास” या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.तिच्याशी केलेली ही बातचीत….
“ऑन ड्युटी २४ तास”मधील भुमिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
स्टार माझावर “गोविंदा रे गोपाळा” हा कार्यक्रम मी केदार सरांकडे काम केलं आहे आणि गेली २ वर्ष मी केदार सरांबरोबर काम करत्ये त्यामुळे सरांनी मला ह्या चित्रपटाविषयी विचारलं तेव्हा मी लगेचचं होकार दिला.
“ऑन ड्युटी २४ तास”मधील भुमिकेविषयी थोडंसं….
ऑन ड्युटीमध्ये मी शारदा रावराणे ही व्यक्तिरेखा साकारत्ये, तिचा मुळ स्वभाव हा धाडसी आहे मात्र घरची परिस्थिती नसल्यामुळे सतत काही ना काही अडथळे येतात मात्र तरीही परिस्थितीवर मात करत ती आपल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करते.
तुझ्या मते “ऑन ड्युटी २४ तास” चं वेगळेपण कशात आहे?
मला वाटतं या सिनेमाचा विषय खुप वेगळा आहे, पोलिसांवर आधारीत हा सिनेमा आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात पोलिसांवर एक गाणं आहे. सिनेमाचा विषय गंभीर असुनही याची मांडणी खुप विनोदी आहे
केदार शिंदेंबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
केदार सरांबरोबर मी या आधीही काम केलं आहे, त्यांची काम करण्याची एक विशिष्ट शैली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सगळ्या टीमला खुप छान सांभाळून घेतात.त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच खुप काही शिकायला मिळतं
सेटवरील वातावरणाविषयी…
ओह! सेटवर आम्ही १५ जणं खुप धम्माल करायचो सलग ३५-४० दिवस एकत्र घालवल्याने आमच्यात एक छान केमिस्ट्री जुळून आली, पण कामाच्याबाबतीत आम्ही सारेच गंभीर व्हायचो. एकंदरीतच आम्ही सगळयांनीच खुप एंजॉय केलं..
सिनेमा केल्यानंतर एक व्यक्ती म्हणून काही बदल झाला कां?
हो, नक्कीचं! ह्या सिनेमामुळे आम्हाला पोलिसांमधला “माणूस” प्रकर्षाने जाणवला, ते सुद्धा आपल्यासारखेचं आहेत ,त्यांनाही घरदार सण वगैरे आहेत याची जाणीव झाली आणि आता जेव्हा केव्हा पोलिसांना बघते तेव्हा मला त्यांच्याबद्दल आदरचं वाटतो.
तुझ्या अपकमिंग प्रॉजेक्ट्स बद्दल…
सध्या मी स्टार प्रवाहवर “मन उधाण वा-याचे” ही मालिका आणि “शंभुराजे” हे नाटक करत्ये
पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा..
धन्यवाद..
संजीवनी जाधव
मालवणी नाटकांची क्वीन म्हणून ओळखल्या जाणा-या संजीवनी जाधव ह्या केदार शिंदे दिग्दर्शित “ऑन ड्युटी २४ तास” या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यांच्याशी केलेली ही बातचीत….
१.) “ऑन ड्युटी २४ तास”मधील भुमिकेसाठी तुमची निवड कशी झाली?
खरं सांगू का? मलाही त्याची कल्पना नाही. एक दिवस केदार शिंदेंचा मला फोन आला की माझ्या चित्रपटात तुम्हाला काम करायला आवडेल कां? पण मला असं वाट्तं की संतोष पवार ने माझं नाव सुचवलं असावं..
२.) “ऑन ड्युटी २४ तास”मधील भुमिकेविषयी थोडंसं….
ऑन ड्युटीमध्ये मी तारामती वाघ साकारत्ये, या बाईचं लग्न झालं आहे आणि नवरा पण पोलिस खात्यात नोकरी करत असतो. दोघांच्याही ड्युटीच्या वेळा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे ह्या नवरा-बायकोला एकत्र यायला वेळच मिळत नाही. त्यातूनच अनेक विनोदी प्रसंग घडत असतात.मुळातच माझी भुमिका विनोदी आहे.
३.) तुमच्या मते “ऑन ड्युटी २४ तास” चं वेगळेपण कशात आहे?
मला वाटतं या सिनेमाचा विषय खुप वेगळा आहे, पोलिसांवर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमातून पोलिसांची सकारत्मक बाजू मांडण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला जातोय हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं..
४.) केदार शिंदेंबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
केदार बरोबर काम करताना खुप मजा आली तो प्रत्येक सीन अतिशय मेहेनतीने करवून घेतो..खरंच खुप छान समजावून सांगतो…
५.) सेटवरील वातावरणाविषयी…
सेटवर आम्ही १५ जणं खुप धम्माल करायचो ,पण सेट्वर विजू मामा (विजय चव्हाण ) असले की जास्तच आम्ही मजा करायचो पण कामाच्याबाबतीत आम्ही सारेच गंभीर व्हायचो.
६.) सिनेमा केल्यानंतर एक व्यक्ती म्हणून काही बदल झाला कां?
हो, नक्कीचं! ह्या सिनेमामुळे आम्हाला पोलिसांमधला “माणूस” प्रकर्षाने जाणवला, ते सुद्धा आपल्यासारखेचं आहेत ,त्यांनाही घरदार सण वगैरे आहेत याची जाणीव झाली आणि पोलिसांना काय काय भोगावं लागतं ते ही आम्हाला या सिनेमामुळेच कळलं
७.)तुझ्या अपकमिंग प्रॉजेक्ट्स बद्दल…
सध्या मी काही मालिका करत आहे पण संजीवनी थिएटर्स तर्फे जानेवारीत “एक नारी सर्वांना भारी “ हे लोकनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
८.) पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा..
धन्यवाद!
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस










 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































