गिरिश कुलकर्णी
अजि म्या अमिताभ पाहिले
पहिलं लिखाण होउन खूप दिवस झाले. दरम्यान विहीर प्रदर्शीत झाला. दिवस गडबडीचे होते. काही लिहावं इतकी उसंत नव्हती. (आणि माझ्या पासवर्ड चा थोडा घोटाळा) या दिवसातले काही फारच स्मरणीय ठरले. `अमिताभ बच्चन' ही जादुई अक्षरं लहानपणापासूनच त्यांचा वेगळा नाद मनाशी निर्माण करून आहेत. आणि कित्येक स्वप्नांचा भाग असलेला त्यांचा प्रत्यक्ष सहवास गेल्या दिवसात लाभला. वारंवार ठोके चुकत होते.
कंठाशी येऊन शब्द फुटत नव्हते. डोळ्यांनी बरच पोहोचवलं अन्यथा संवाद अवघड होता. काय मजा आहे ना माणसाच्या ठायी? भारून जाणे, दिग्मूढ होणे ईत्यादि अवस्था अनुभवता येतात हे केव्हढं मोलाचं आहे. यातलं माणूसपण जपायला हवं. तसच लहान होता येणंही! स्वतःच्या शहाणपणाला, अहंकाराला पूर्णतया समर्पीत करून लहान होण्याचे हे क्षण मी पूरेपूर उपभोगले. आपल्याकडे साक्षात्काराला मोठं महत्व आहे. साक्षात्कारातून मिळणारं ज्ञान काही विशेष! शब्दांच्या पलिकडचं! प्रत्येक क्षणाचा कणन् कण अनुभवावा अन स्मरणबंद करून जपावा असे काहीच विरळे साक्षात्कार! माझ्या वाटयास तो यावा असं कोणतही सज्जड पूर्वकर्म नसताही तो आला या अर्थी ईथून पूढे तरी काही दिव्य करण्याची प्रेरणा देण्यासाठीच ती योजना असावी.
तर! माझ्या दूपटीने वय असलेले हे ग्रहस्थ ( शुद्धलेखनाच्या चूका मोठ्या मनाने माफ करा) रोज ब्लाँग लिहीतात. माझ्या चॉपटीने काम करतात, कविता वाचण्या ईतकी तरलता साध्य करतात, अभिनयाची नवी आव्हानं पेलतात आणि मिडीयातल्या काही मूर्खांनी उडवलेली राळ आपल्या सभ्य उत्तरांनी सुसंस्कारीत करीत रहातात. मला यातलं काय जमेल? मी प्रश्नांकीत आहे पण प्रेरितही !!!
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
मम ब्लॉग
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू
आजचा वाढदिवस

