पुष्कर श्रोत्री
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू असताना गाडया चालवणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणे. कधी कधी तर मी पाहिलं आहे की सिग्नल संपण्यासाठी ३-४ सेंकद बाकी राहिले तरी लोक सरळ गाडया चालवतात. तेवढी सुध्दा शिस्त सध्या वाहनचालकांमध्ये राहिली नाही, याचा मला खूप त्रास होतो. वेळेच्या बाबतीत लोकांचा बेजबाबदारपणा, अनियमितपणा याचा मला खूप त्रास होतो. काही वेळा छापील किंमतीव्यतिरिक्त स्वत:च्या वेगळया किंमती लावून दुकानदार आम्हाला लुटत आहेत ते देखील माझ्या दृष्ट्रीनं समाजकंटक आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी करायला हवं, असं मला प्रामाणिकपणं वाटतं. हे मी आम्च्या फिल्डव्यतिरिक्त जे घडतयं त्याच्या विषयी मी बोलतोय.
आमच्याही फिल्डमध्ये मला त्रास होतो आहे तो पायरसीचा. मला असं वाटतं की नार्कोटिक्सचा जसा कडक कायदा झाला तसा पायरसीचा कडक कायदा हवा. मग ज्याच्या हातात पायरेटेड सीडी सापडली तोही तितकाच गुन्हेगार. मग त्याने म्हणू नये की मला ही सीडी इथे सापडली, तिथे सापडली, मी चुकून घेतली, याने दिली तुझ्या हातात सापडली ना मग तू सुध्दा गुन्हेगार. त्याला अजामीनपात्र शिक्षा केली जावी, त्याला अटक व्हावी. प्रेक्षकांमध्ये सुध्दा त्यामुळे जागरूकता निर्माण होईल की चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा. एक चित्रपट तयार करण्यामागे अनेक लोकांची मेहनत असते. जेव्हा तुम्ही पायरेटेड सीडी घरी आणून पाहता म्हणजे तुम्ही सगळया कलकारांच्या मेहनतीवर पाणी फिरवता. याचासुध्दा प्रेक्षकांनी विचार करायला हवा.
आणखी एका विषयावर मला बोलायचं आहे म्हणजे आपल्याकडे सणासुदीला लोक एवढे बोकाळले आहे की हे सण माझ्या आयुष्यात कधी आलेच नाहीत. एवढया मोठया प्रमाणावर सण साजरे केले जातात. गणेशोत्सव असा काही साजरा केला जातो की त्याला काही मर्यादाच नाही. हे मान्य आहे की टिळकांनी सामाजिक प्रबोधनासाठी गणेशोत्सव सुरू केला त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती सगळया गोष्टी मान्य पण जागोजागी गणेशोत्सवाची मंडळे बोकाळ्ली आहेत. या गणेशोत्सवाच्या मागे काय चालतं हे आपल्या सगळयांना माहिती आहे. त्या मिरवणूका, ते आवाज , ती गाणी याचा इतका त्रास व्हायला लागलाय ना, दांडिया आहे, गरबा आहे. त्यानंतर दिवाळी आहे मग ती दिवाळी केवळ दिवे आणि पणत्यापुरती मर्यादित न राहता एवढया मोठया प्रमाणावर फटाके फोडण्याची गरज आहे का, एवढं ध्वनीप्रदूषण करण्याची गरज आहे का, आपण आपल्याला त्रास होईल अशा अनेक गोष्टी करत आहोत.
त्यानंतर काय मग ख्रिसमस आला मग काय दिवाळी झाली की मग नवीन वर्षाच्या पार्ट्या ते झालं की मग १४ फेब्रुवारी आहेच मग ते प्रेम असं साजरं करायचं की यापूर्वी आपल्याला प्रेम मिळालचं नाहीये. सण संपतच नाहीये अरे थांबा जरा आणखी बर्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सुस्त, उदासीन झालो आहोत. आपल्या अजून बर्याच गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी लढायचं आहे. कुठलाही देश प्रगतीपथावर नेण्यासाठी तिथल्या दळणवळणाच्या सुविधा असाव्यात त्यासाठी आपण रस्त्यावर उतरायला हवं, असं नाही का वाटतं. रस्त्यांवर खड्डे आहेत, खूप ट्रॅफिक आहे. यासाठी तुम्ही काही करणार आहेत की नाही. बास झाले आता सण साजरे करणं आणि बास झाले ते सोहळे त्यापेक्षा या प्रश्नांचा विचार करायला हवा असं मला प्रामाणिकपणं वाटतं.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
मम ब्लॉग
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू
आजचा वाढदिवस

