सोनाली कुलकर्णी

Image: 

क्षणभर विश्रांती

आजचा आपला मराठी सिनेमा थीमवाईज तर बदलत चलला आहेच पण प्रमोशनच्या पातळीवरही बदलतो आहे.मार्केटिंग स्ट्रॅटजीचा विचार होतो आहे.दिग्दर्शकांच्या द्रुष्टीकोनातही फरक होतो आहे. या पाडव्याला माझ्या 'क्षणभर विश्रांती'या सिनेमाचं म्युझिक लाँच झालं.तेही अगदी वेगळ्या पध्दतीने.यासाठी आम्ही कोणतही हॉटेल घेतलं नव्हतं तर त्याएवजी मुंबईच्या 'नक्षत्र' मॉलच्या बाहेर स्टेज लावला होता.तिथे आम्ही त्याचं लाँच केलं.लोकांनी ती गाणी ऐकली .ज्यांच्यासाठी गाणी बनवली आहेत ती डायरेक्ट लोकांनाच ऐकवली. आम्हाला खुप सुंदर रिसपॉन्स मिळाला.
या सिनेमाचे दिग्दर्शक सचित पाटील यांचीच ही आयडिया होती.या सिनेमाचं संगीत ऋषीकेश कामेरकर याने दिले आहे आणि शिल्पा पै हिने गाणी गायली आहेत.संगीत हा या सिनेमाचा आत्मा आहे.रोमँटीक,पिकनिकसाठी,डिस्को असे ट्रॅक आहेत.हा एक संपूर्ण अल्बम आहे.