फिरोदिया अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेले प्रयोग

पुण्यातील मानाच्या `फिरोदिया करंडक स्पर्धे’ची प्राथमिक फेरी आज पार पडली. तरूणाईच्या जल्लोषात गेल्या ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्राथमिक फेरीत अनेक महाविद्यालयांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. या महाविद्यालयांमधून अंतिम फेरीसाठी 'बीएमसीसी`, `व्हि.आय.आय.टी', `सिंहगड अभियांत्रिकी', `विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', `फर्ग्युसन कॉलेज', `मॉडर्न इंजिनिअरींग कॉलेज' आणि `एमआयटी सीओई' या महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना ‘मम’ टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट.....!