वैभव तत्ववादी

Images: 

‘फिरोदिया करंडक’ ची माझ्या जीवनात अतिशय महत्वाची भूमिका- वैभव तत्ववादी
‘फिरोदिया करंडक’ ने माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. इंजिनिअरींग कॉलेजमधे त्यावेळी फारशी अभिनेत्यांची फौज नव्हती. त्याकाळात मला चार वर्ष फिरोदिया करण्याची संधी मिळाली. मी ती खूप एन्जॉयही केली. मला अजूनही आठवतं, त्यावेळी माझे आई-वडिल माझ्या एकांकिकांचे प्रयोग पहायला कधी भरतला तर कधी यशवंतरावला यायचे आणि तेही नागपूरहून..ते सगळं मी माझ्या पॅरेंन्टसना अर्पण करतो. आणि जे यश मी त्या चार वर्षात मिळवलं त्याचं श्रेय मी माझ्या कॉलेजच्या टीमला देईन. मी खासकरून ऋणी आहे तो अक्षय टिळक, विनय नारायणे, अभिषेक महाजन, अक्षय देशमुख आणि माझ्यावर नेहमी टिका करणारा माझा भाऊ गौरव या सर्वांचा. माझ्यात आज आणि त्या चार वर्षात झालेले बदल हे याच लोकांमुळे झालेत. यांच्याबरोबरच असे अनेक जण आहेत ज्यांनी मला मदत केली, सपोर्ट केला पण त्या सर्वांच्या नावांची यादी मी इथे देऊ शकत नाही. आजही माझ्या मनात ‘सीओईपी’ आणि ‘फिरोदिया’च्या त्या आठवणी तशाच्या तशा ताज्या आहेत. आजही मला कॉलेजचा तो पहिला दिवस आठवतो. नागपूरहून आलोय म्हणून पुण्यात अ‍ॅडजेस्ट करू शकणार नाही यागोष्टीमुळे नर्व्हस. मात्र हळूहळू व्यवस्थित झालं सगळं. ‘फिरोदिया’ मुळेच मला घरापासून दूर असलेलं घर मिळालं ते म्हणजे ‘सीओईपी कल्चरल ग्रुप’..! खास या गोष्टीसाठी मी ‘फिरोदिया करंडक’चा नेहमी आभारी राहीन. शेवटी सर्व कॉलेजेसना मी शुभेच्छा देईन आणि एकचं म्हणेन.....आवाज कोणाचा सीओईपीचा........!

शब्दांकन - अमित इंगोले