सिद्धेश्वर झाडबुके
कला-गुणांना वाव मिळण्यास अप्रतिम असा प्लॅटफ़ॉर्म म्हणजे ‘फिरोदिया करंडक’- सिद्धार्थ झाडबुके
गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा सातत्याने आणि यशस्विरीत्या आयोजित करणा-या ‘फिरोदिया’, ‘फिरोदिया ग्रुप’ आणि संयोजकांचे मी आभार मानावे तेवढे कमीच आहे. कारण यामुळे कॉलेज स्तरावरील आणि कॉलेजमधील फक्त नाटकच नाही तर तुमच्यामधे असलेल्या कुठल्याही चांगल्या कला-गुणांचं प्रदर्शन तुम्हाला रसिकांसमोर मांडता यावं, यासाठी हा अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे.
वर्षानुवर्षे या रंगमंचावर विविध कला सादर केल्या जात आहेत. दरवर्षी त्यात नाविन्याची भर पडत आहे. आज त्यात सहभाग घेणा-या नवनवीन कलाकारांनी आणखी रंगत आणली आहे. आमच्या वेळेला या स्पर्धेत बॉडी-शो, मलखांब ह्याही गोष्टी केल्या जायच्या त्यामुळे या स्पर्धेतून फक्त अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन यालाच वाव मिळत नाही तर खेळांनाही वाव मिळते. अनेक गुणवान कलाकारांना समोर येण्याची संधी मिळते. त्यापैकीच एक आमचा मित्र मनोज पंड्या हा पाठीमागूनही गिटार वाजवू शकत होता. त्यावेळी ‘निले निले अंबर पे’ या गाण्यातील ताल त्याच्या वाजवण्याचं वैशिष्ट्य आणि आकर्षण होतं. त्यासाठी त्याला वन्समोर मिळायचाच.
* किस्सा- त्यावेळचा सगळ्यात जास्त लक्षात राहणारा किस्सा म्हणजे, लावणीवर आम्ही ब्रेक डान्स आणि लावणी केली होती. अशा प्रकारचं नृत्य ‘फिरोदिया’च्या इतिहासात प्रथमच सादर करण्यात आलं होतं.
* यात सातत्याने काम करणा-या कलाकारांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो..!
शब्दांकन- अमित इंगोले
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







