"तुझ्याविना"-ट्रिनिटी कॉलेज
फिरोदिया करंडक प्रार्थमिक फेरी:
एकांकिकेचे नाव: ‘तुझ्याविना’
महाविद्यालयाचे नाव: ट्रिनिटी कॉलेज
एकांकिकेचे कथानक:
अमित हा एक सर्वांपेक्षा वेगळा मुलगा आहे.प्रत्येक गोष्ट करताना त्यामागे त्याचा काहितरी विचार नक्की आहे.अमितचे आशू वर प्रेम आहे पण तसे मान्य करायला तो इतक्यात तयार नाही.त्याचं असं म्हणणं आहे की एकमेकांच्या सहवासातून येणारा आनंद हा रिलेशनशिप च्या व्यतिरिक्तही अनुभवता येउ शकतो.त्याचं ठाम मत आहे की एखादी गोष्ट,मग ती वाईट का असेना,करण्याच्या आवाक्यात असली तर करून बघाण्यात काय हरकत आहे? त्याच्या अशा विचारांना आशू एक दिवस वैतागते आणि त्याला त्यांच्या एकत्र असण्याबद्दल काय ते ठरवायला सांगते.आशू तिला मत बदलू शकत नसल्याचे सांगतो पण पुढे असेही सांगतो की तो नसताना त्याची कवितांची डायरी तिच्या बरोबर नेहमी असेल.दुसर्या दिवशीपासून अमित नाहिसा होतो.तशी आशू त्याची डायरी वाचून स्वतःचे समाधान करून घेऊ लागते.त्यच्यी डायरी वाचून ती सुध्दा अमित सारखेच फिलोसॉफ़िकल बोलु लागते.हे चालू असताना एक दिवस अमितची डायरीतली आठवण (?) तिच्यासमोर येऊन तिला डायरी न वाचण्याची विनंती करते-तिला जशी आहे तशी राहण्यासाठी विनवते.पण ह्यावेळी आशू अमितला त्याचेच "एखादी गोष्ट,मग ती वाईट का असेना,करण्याच्या आवाक्यात असली तर करून बघाण्यात काय हरकत आहे?" हे वाक्य ऐकवून गप्प करते.ह्या वेगळ्या नोट वर नाटकाचा अंत होतो.
नाटक एका फ़ारच वेगळ्या विषयावर आधारित होतं.एका मुलाचा विचार करण्याचा प्रचंड अवाका आणि त्याचा एका मुलीवर असलेला जबरदस्त प्रभाव दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न खरोखर दाद देण्यासारखा.दिग्दर्शन बरं होतं.विषयाची निवड वेगळी असल्याने त्यावर काही मर्यादा आल्या.अभिनय देखिल बरा होता.संगीत विभागाने चांगली कामगिरी केली.विषेशतः त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता.कोरस मधे म्हणलेली गाणी छान होती.इतर कलाप्रकारां मधे संघाने सुंदर चित्रकला व मूर्ती बनवणे हे इव्हेंट सादर केले.एकंदर पाहता प्रयत्न चांगला होता-पण सुधारणेस अजून खूप जागा आहे.
-मराठी मनोरंजन टीम
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







