`विड्रॉल'- कावेरी कॉलेज
महाविद्यालयाचे नाव- कावेरी कॉलेज
एकांकिका - विड्रॉल
एकांकिकेचा आशय -
अविनाश ह्या ड्रग अॅडिक्ट मुलाचे रीहॅबिलिटेशन आणि त्याने केलेल्या त्यांच्या अनुभवांचे कथन हा कथेचा पाया होता.नाटकाच्या सुरुवातीला डॉक्टरांच्या क्लीनिक मधे कथा सुरू होते.तिथे अविनाश आपल्या नशेच्या आहारी गेलेला असतो.डॉक्टर त्याला एक अठवडा रीहॅब मधे काढ्ण्याचा सल्ला देतात.तिथून अविनाशचं कथन सुरू होतं.वाईट संगतीला लागलेला अविनाश ड्रग्स घेण्यासाठी घरून पैसे घेत असतो.एका स्पर्धेत अशा अवस्थेत गेल्यामुळे त्याला कॉलेज मधून काढून टाकण्यात येते.ह्यानंतर पैसे देण्यास आईने मनाई केल्यामुळे तो घर सोडून निघून जातो.पुढे बरोबरच्या अॅडिक्ट बरोबर राहत असताना पैशांअभावे त्याला ड्रग्स मिळवण्यासाठी नको नको त्या गोष्टी कराव्या लागतात,अगदी स्वतःला एका माणसाला विकेपर्यंत! पण ह्या प्रसंगांतून कसाबसा डॉक्टरांपर्यंत पोचलेला अविनाश त्यांनी दिलेल्या माहिती आणि मदत ह्यांच्यामुळे तो सुधारण्यात यशस्वी होतो.
नाटकाचा विषय जरा वेगळा होता.पण नाटकात काही गोष्टींचे स्पष्टीकरण मिळत नाही-उदाहरण अविनाश घर सोडण्याइतका मोठा निर्णय सहजासहजी कसा घेतो वगैरे.अभिनय ठीक ठीक होता.संगीत चांगले होते पण काही जागा अशा होत्या की जिथे जरा कमी आवाज चालला असता.नृत्य दिग्दर्शन चांगले होते पण नक्की दाखवायचे काय होते हे फ़ारसे स्पष्ट झाले नाही.नृत्यात "कंटेंपररी" प्रकाराचा प्रामुख्याने वापर केला होता.नाटक जरा विस्कळित वाटलं.नाटकाच्या शेवटी एका गाण्यावर नृत्य न बसल्याचे दिसून आले.सगळं लक्षात घेता कावेरी कॉलेज चा प्रयत्न छान होता पण आपल्या विचाराला हवा तेवढा न्याय देणं काही त्यांना जमलं नाही असं म्हणावं लागेल.
-मराठी मनोरंजन टीम
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







