'व्हर्च्युअल रिअॅलिटी'-पी.ई.एस. मॉडर्न कॉलेज
फिरोदिया करंडक प्राथमिक फेरी
महाविद्यालयाचे नाव - पी.ई.एस. मॉडर्न
एकांकिका - 'व्हर्च्युअल रिअॅलिटी'
एकांकिकेचा आशय -
एंटरटेनमेंट च्या जगातल्या दिखाऊपणा मधे गुंतून गेलेल्या मिहीर ची ही गोष्ट.प्रति आयुष्य जगायची एक संधी देणार्या एका खेळात गुंतून गेलेला मिहीर खर्या आयुष्यावरची ग्रिप हळूहळू सोडत जातो व व्हर्चुअल आयुष्यात मरण्याची वेळ येताच खर्या आयुष्याची किंमत कळून पस्तावतो.आणि शेवटी खर्या जीवनाचे पुनरुथ्तान करण्याची पहिली पायरी म्हणून आपल्या व्हर्चुअल आयुष्यातल्या अवतारचा जीव घेतो.आपल्या आयुष्यातला एकेक टप्पा एखाद्या गेम मध्ल्या लेव्हल ला समांतर दाखवून दिग्दर्शकाने वेगळीच मजा आणली आहे.
दिग्दर्शक आणि लेखकाने उत्तम काम केले आहे.नाटकाला शोभेल असाच साधा सोप्पा मिहीर नटाने उभा केला आहे.त्याला साथ देणारा "हेल्प" हा ही तितकाच छान जमलाय.
नाटकात संगीत व नृत्याचा उत्तम मेळ घालण्यात संघ यशस्वी झाला आहे.नृत्ये फ़ारच छान बसली होती.नाटकात नृत्याचा वापर शॅडो-प्ले बरोबर खुबीने केला गेला.नाटकात इतर प्रकार भरपूर दखवले गेले.हलते चित्र,चित्रकला सारखे बरेच कलाप्रकार सादर केले गेले.पण व्हर्चुअल अयुष्यातले वेगवेगळे टप्पे चांगल्या पद्धतीने दखवणार्या लेखक व दिग्दर्शकाचे अभिनंदन.मॉडर्न कॉलेज ने ह्या वर्षीचा शेवटचा प्रयोग अतीशय उत्तम प्रकारे निभावून नेऊन पहिल्या फ़ेरीचा छान अंत घडवून आणला आहे.
-मराठी मनोरंजन टीम.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







