‘काशीयात्रे’-फर्ग्युसन महाविद्यालय
फिरोदिया करंडक प्रार्थमिक फेरी:
एकांकिकेचे नाव: ‘काशीयात्रे’
महाविद्यालयाचे नाव: फर्ग्युसन महाविद्यालय
एकांकिकेचे कथानक:
गोष्ट ‘काशीयात्रे’ कादंबरीची ओढ लागलेल्या आजीची(अनुजा वर्तक). तिची शाळेत जाणारी नात गौरी(मधुरा जुगादे). दर आठवडयाला त्यांच्या घरी येणारा अंक. त्यात येणारी काशीयात्रे या कादंबरीच्या कथा भाग रुपाने येत असतात. ती कथा एका आजीची. त्या आजीला ओढ लागलेली असते ती काशीला जायची. तिचा जीव ती शेजारच्या लहानग्यावर टाकते. त्याला सुध्दा आपल्या बरोबर घेऊन जायचं ती ठरवते. त्या दोन तिकीटांच्या पैशासाठी खूप जमवा जमव करते. पण त्या लहानग्याला इलेक्ट्रिकच्या खांबाचा शॉक बसून तो जातो. ती आजी एका वृध्दाश्रमात काम करीत असते. तिथेच असणारी एक मुलगी उदास दिसते. आजी कारण विचारता, ती म्हणते त्याचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण लग्नासाठी पैसे नाही." ही कथा गौरी आपल्या आजीला वाचून दाखवत होती. ती ऎकताना आजीचा कंठ दाटून येतो. आणि पुढच्या अंकाची ओढ तिला लागते. दरम्यान त्यांच्या नात्यात लग्न असतं. आजी गौरीला पाठवते. त्या दिवसात नेहमी प्रमाणे अंक येतो. सवयीने ती कथा वाचायला जाते. आणि लक्षात येतं की आपल्याला वाचता येत नाही. आपण निरक्षर राहिलो. ती पोस्टमनला वाचून दाखवण्यास सांगते पण त्याला ही वेळ नाही. ती हताश होते. पण धीर न सोडता आता वाचायला शिकायचं असा निश्चय करते. गौरी आल्यावर तिला सागंते. गौरी आजीला शिकवते. आजी तिला ओवाळते. तेव्हा आजी तिला नमस्कार करते तिला आपली गुरु म्हणते. तर आजीला गौरी ‘काशीयात्रे’ हि कादंबरी भेट म्हणून देते.
या एकांकिकेत शिकण्याची जिद्द, आवड, कथा वाचताना देखील होणारा भावनांचा कल्लोळ, नाती वरचे प्रेम, ज्याने केले त्याला श्रेय देण्याचा स्वभाव मग लहान मोठं कोणीहि असो. असे आजीच्या स्वभावातील बारकावे सांगता येतील. तर गौरीने आजीला केलेली मदत. आजीबद्दलच्या उत्तुंग भावना जपणारी, सांभाळणारी, अवखळ, मैत्रिणींची ओढ असलेली गौरी आपल्याला दिसते.
नृत्यमय नाटक असे जर या एकांकिकेला म्हटले तर वावगं ठरणार नाही. नाटकात डान्स पेरलेले होते. दिवा घेउन, डोळयाला पट्टी बांधून, पारंपारीक नृत्य, ‘डाव, शहाळ, कळशी, सूप, काठी’ याचा वापर करत डान्स सादर झाले होते.
यु व्ही लाईट शो अप्रतिम झाला. नाटकाची मूळ कथा सुधा मुर्तींची तर त्याचं नाट्यरुपांतर सागर देशमुख आणि सायली सहस्त्रबुध्देने केले होते. पर्ण पेठेने ही एकांकिका दिग्दर्शित केलेली आहे. पण अभिनय चांगला, विषय चांगला असूनही ती इतकी परीणामकारक वाटली नाही.
-मराठी मनोरंजन टीम
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







