‘तमाशा’-पी आय सी टी

फिरोदिया करंडक प्रार्थमिक फेरी:
एकांकिकेचे नाव: ‘तमाशा’
महाविद्यालयाचे नाव: पी आय सी टी
एकांकिकेचे कथानक:
या कथेत लावणीचा अभ्यास करणारी अपर्णा(किरण बोरसे) पुण्याहून पारंपारिक लावणी जिथे असते अशा एका फडात रहायला येते. तो फड असतो चंद्रकलाबाईचा(तेजल झोपे). चंद्रकला आणि तिच्या फडातील सर्वांचा अभ्यास करण्यासाठी अपर्णा ते सगळे सहकार्य करतात. त्या गावच्या सरपंचामुळे त्यांना रहायला तो फड असतो. पण आता नवीन पिढीचं राज्य. गावचा छोटे पाटील तिला म्हणतो की आता नवीन सिनेमातल्या गाण्यावर नाच करा नाहीतर हा फड सोडा. तेव्हा अपर्णा म्हणते की आपण काही तरी करू यावर उपाय काढू. ती सरकारकडे दाद मागते. काही तरी सवलत द्या नाही तर ही लोकनृत्य कालांतराने लोप पावतील. पण तिचा आवाज कोणी ऎकत नाही. त्याच वेळी गावात चंद्रकलाबाईच्या फडाचे हाल होत होते. पैसे नाहित. आणि जगायचं तर पाटीलाने सांगितल्याप्रमाणे आता लावणी सादर केली पाहिजे. आणि ते तसं करतात.
पारंपारिक ते चित्रपट लावणीचा प्रवास का स्विकारावा लागतो. हे दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. अभिनयाचा, संवादाचा अभाव जाणवला. डान्स आणि इव्हेंट जसे- यु व्हि लाईट शो आणि रंगीत बॅकग्राउंड याचा सुरेख संगम झालेला दिसला.

-मराठी मनोरंजन टीम