‘सोंग’-आय एल एस लॉ कॉलेज
फिरोदिया करंडक प्रार्थमिक फेरी:
एकांकिकेचे नाव: ‘सोंग’
महाविद्यालयाचे नाव: आय एल एस लॉ कॉलेज
एकांकिकेचे कथानक:
गोष्ट मीरा(स्वानंदी टिकेकर) आणि कबीरच्या(भूषण पाटील) प्रेमाची. मीरा एक डॉक्युमेंटरी बनवत असते ‘महाराष्ट्राची लोककला’ या विषयावर. त्यात भूमिका करायला ती दोन बहुरूपींना तयार करते. कबीर आणि राजू(अभिनीत पंगे). पण काही दिवसांच्या सहवासाने कबीर मीरावर प्रेम करू लागतो. पण तिला कसे सांगावे, ती काय म्हणेल, ती कुठे मी कुठे, अशा अनेक प्रश्नांच्या जाळयात तो अडकतो. आणि मनातलं बोलत नाही. मीरा कबीरला तिच्या मैत्रिणीच्या पार्टीला घेऊन जाते. तिची मैत्रिण त्याचा बहुरूपी असे हिणवून अपमान करते. त्यामुळे कबीर दुखावतोच पण मीराला ही फार वाईट वाटते. तो जेव्हा नाशिकला जायला निघतो तेव्हा ती त्याच्या जवळ प्रेमाची कबुली देते. आधी तो ही नकार देतो पण मग ते एकमेकांना स्विकारतात.
कथानक सोपं. यातून लोककला सादर करणार्यांची परिस्थिती कदाचित लेखकाला(भूषण पाटील) सांगायची असावी. आणि अजून एक की, प्रेमाला कशाचंही बंधन, अपेक्षा नसतात हेही सुचवायचं असावं. छोटसंच पण सहज अभिनय करणार्या राजू आणि अजून एक बहुरूपी पोलिसाच्या वेशातील(अमर गायकवाड) यांनी उत्तम भूमिका वठवल्या. डान्स, रोप मलखांब, रींग कसरती आणि नाटकाची लाईट भाषा यात होत्या . पण थोडा शिव्यांचा अवास्तव वापर नाटकात होताना दिसला. अभिजीत ढेरेने दिग्दर्शन केले आहे. संवादातून सांगायच्या गोष्टी फारशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या नाहीत असे मला वाटते.
-मराठी मनोरंजन टीम
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







