'उंच माझा झोका' झी मराठीवरील नवी मालिका 'उंच माझा झोका' झी मराठीवरील नवी मालिका

'उंच माझा झोका' झी मराठीवरील नवी मालिका 'उंच माझा झोका' झी मराठीवरील नवी मालिका

न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मराठी मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. या माइलेचा काळ हा एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आहे. त्याकाळात तेव्हा सर्रास बालविवाहाची प्रथा रूढ होती. असे बालविवाह सगळीकडेच होत असत. फक्त मागसलेल्या ठिकाणीच नाही तर पुण्या-मुंबईसारख्या शहरांतूनही बालविवाह मोठया प्रमाणावर होत असत. असाच एक बालविवाह पुण्यात झाला. लिहिता आणी वाचता न येणार्‍या सातार्‍यातल्या अकरा वर्षाच्या एका अल्लड मुलीचा विवाह झाला. तो मुलगा उच्चशिक्षित आणि विद्वान गृहस्थ होता. या मुलाने स्वतःच्या बायकोला शिकवण्याचा ध्यास घेतला. इतकंच नाही तर आपल्या बायकोने शिकावे म्हणून त्याने खास मास्तरीणबाईंची नेमणूक केली. मात्र नवरा जरी सुधारक मतांचा असला तरी मुलीच्या शिकण्याला घरच्यांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे नवर्‍याची पाठ फिरली की घरातल्या स्त्रियांच्या टोमण्यांनी ती बेजार व्हायची. मात्र अडचणींवर मात करत ही मुलगी शिकली. केवळ मराठीच नाही तर इंग्रजी आणि बंगाली भाषाही शिकली. नवर्‍याच्या मृत्यूपर्यंतही त्याच्यासोबत ती सावलीसारखी राहिली. नवर्‍याच्या मृत्यूनंतरही तिने खूप मोठं सामाजिल काम केलं.
गेल्या शतकातील सामाजिक सुधारक महिलांमध्ये रमाबाई रानडे यांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या 'सेवासदन'या संस्थेचं काम अजुनही सुरू आहे. अकरा वर्षांच्या विवाहितेपासून ते सामाजिक कार्य करणार्‍या समंजस स्त्रीचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका झी मराठीवर प्रसारित होणार असून या मालिकेमुळे पुन्हा झी मराठी टीआरपीच्या स्पर्धेत बाजी मारणार का हे लवकरच कळेल.