ग्रामस्वच्छतेवर आधारित'येडयांची जत्रा'

ग्रामस्वच्छतेवर आधारित'येडयांची जत्रा'

सामाजिक समस्यांबरोबरच त्या समस्यांचं सादरीकरण विनोदी आणि उपहासात्मक पध्दतीने करण्याची मराठी चित्रपटांची शैली आज बर्‍याच प्रमाणात लोकप्रिय झालेली दिसून येते. या विषयांमुळे समस्या लोकांपर्यंत पोहोचते शिवाय त्याबद्दल लोक अंर्तमुख होऊन विचार करताना दिसतात. हाच विचार करून दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि निर्माते विश्वजीत गायकवाड यांनी पहिल्याच चित्रपटात स्वच्छता मोहीमेच्या निर्मलग्राम योजनेवर आधारित 'येडयांची जत्रा'हा मराठी चित्रपट तयार केला आहे. पहिल्याच प्रयत्नात निर्माता आणि दिग्दर्शकांनी एका धाडसी विषयाला हात घातला आहे.
ऐरीप्लेक्स ४१६ प्लस.एच.एस या कॅमेर्‍यावर केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्यामुळे विषयाबरोबरच तांत्रिकदृष्टया चित्रपट उत्तम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'ऐरीप्लेक्स ४१६ प्लस.एच.एस'हा अतिशय कमी वजनाचा कॅमेरा असून तो हाताळण्यास अत्यंत सोपा असून त्याचा पिक्चर क्वालिटीचा रिझल्ट उत्तम आहे. चित्रपटाचे संकलन विजय खोचीकर यांनी केले असून कला दिग्दर्शन राजू सापते व राजन खाडे यांनी केले आहे. भरत जाधव, मोहन जोशी, विनय आपटे, संदीप पाठक, पॅडी कांबळे, निशा परूळेकर, आरती सोळंकी, विशाखा सुभेदार, आनंद कारेकर, जयराज नायर, गणेश मयेकर, सुहास भालेकर, प्रकाश भागवत, सतीश तारे, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर आणि नवोदित स्नेहा कुलकर्णी यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. येडयांची जत्रा'हा चित्रपट ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.