तरूणाईला साद घालणारा 'सतरंगी रे'
तरूणाई आणि त्यांच्या आजुबाजूचं विश्व, या काळात त्यांची स्वप्न, भविष्याबाबतचे विचार, अशा सगळया गोष्टींचा भडिमार त्यांच्यावर होत असतो. कॉलेज गोईंग तरूणांचा रॉकबँड आणि त्यांची स्वप्नं हा विषय तसा हिंदी चित्रपटसृष्टीला काही नवा नाही. अनेक चॉकलेट आणि रोमँटिक हिरोंनी असे विषय स्वतःच्या पदार्पणासाठी निवडले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला आणि समीक्षकांची पसंती मिळवलेला रणबीर कपूरचा 'रॉकस्टार'चांगला चित्रपट म्हणून गणला गेला. मात्र मराठी चित्रपटांचा विचार केला तर हा विषय मराठीला नवीन आहे. मूळात मराठी चित्रपटात आजवर 'हिरोईझम' असा नव्हताच. अभिनेते म्हणून आजही मराठी नायक-नायिका ओळखल्या जातात. सशक्त कथा आणि उत्तम अभिनयाच्या बळावर मराठी चित्रपटाला एक समृध्द परंपरा आहे.
याच परंपरेतलं एक महत्वाचं पान म्हणजे सशक्त आणि आशयघन कथेबरोबरच तरूणाईला साद घालणारे अनेक विषय मराठी चित्रपटांमध्ये येताना दिसत आहेत. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला'सतरंगी रे'हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीस येतो आहे. तरूणाईला साद घालणारे तरूण कलाकर चित्रपटाच्या जमेची बाजू आहे. सिध्दार्थ चांदेकर, आदिनाथ कोठारे, भूषण प्रधान, पूजा सावंत, अमृता खानविलकर, सौमिल शृंगारपूरे तसेच विदयाधर जोशी, उदय टिकेकर, श्रीरंग देशमुख, माधव अभ्यंकर, सीमा देशमुख, सुप्रिया विनोद, माधव अभ्यंकरसारखी तगडी कलाकार मंडळी यात आहेत. 'मैत्री प्रॉडक्शन प्रस्तुत', 'विश्वास चित्र निर्मित, आजच्या तरूणाईची कथा आहे 'सतरंगी रे'या चित्रपटात. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणार्या तरूणांना स्वतःचा बँड तयार करायचंय पण घरच्यांचा त्याला विरोध आहे. कॉलेज, संगीत, फ्रेंडशिप, करिअर, नातेसंबंध, पैसा अशा विविध मुद्दयांवर हा चित्रपट भाष्य करतो. आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यापूर्वी त्यांनी 'उलाढाल' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संगीत हे या चित्रपटाचं वैशिष्टय असून आठ विभिन्न भावछटांचा यात समावेश आहे. शान, सुनिधी चौहाण, शंकर महादेवन या नामवंत हिंदीतील गायकांनी या चित्रपटात गाणी गायिली आहेत. 'सतरंगी रे' हा चित्रपट फेब्रुवारीत प्रदर्शित होणार आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































