पुण्यात बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुण्यात बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन

चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं आजपासून पुण्यात बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचं उद्घाटन आज पुण्यात अमनोरा टाऊन सेंटर येथे ज्येष्ठांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ.मोहन आगाशे, अरूण दत्त, सुशोवत बाणेरजी आणि किम कुली यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरूवार, दि.२९ रोजी दुपारी १२.०० वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला 'हा भारत माझा' या चित्रपटाचे प्रिमिअर होणार आहे. तर दुपारी २.०० वाजता आनंद पटवर्धन दिग्दर्शित 'जय भीम कॉम्रेड' आणि संध्याकाळी ६.०० वाजता या महोत्सवाचा समारोप होणार आहे.