'फू बाई फू'चा चौथा सिझन 'फू बाई फू'चा चौथा सिझन

'फू बाई फू'चा चौथा सिझन 'फू बाई फू'चा चौथा सिझन

झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या पर्वात परीक्षक कोण आणि सहभागी कलाकार कोण असणार आहेत, याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. झी मराठीवर प्रसारित होणारा हा कार्यक्रम पहिल्या पर्वापासूनच लोकप्रिय झाला होता. निर्मिती सावंत आणि स्वप्नील जोशी यांनी यापूर्वी 'फू बाई फू'चं परीक्षण केलं असून तिसर्‍या पर्वात रेणूका शहाणे यांनी परीक्षणाचं काम केलं होतं. पण झी मराठीवर सुरू असलेल्या आणि नव्याने सुरू होणार्‍या मराठी मालिकांमुळे आता या कार्यक्रमाला कोणती वेळ दिली जाणार किंवा कोणती मालिका बंद होणार हे 'फू बाई फू'चा चौथा सिझन सुरू झाल्यावरच कळेल.