'हर्बेरिअम'पुस्तकाचं प्रकाशन

'हर्बेरिअम'पुस्तकाचं प्रकाशन

सुनील बर्वे यांच्या'हर्बेरिअम'उपक्रमांतर्गत पाच उत्तम आणि दर्जेदार नाटक रंगभूमीवर सादर झाली. या सर्वच नाटकांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सुनील बर्वेंच्या या उपक्रमाचं खूप कौतुक झालं. सुनील यांना हा उपक्रम करताना आलेले अनुभव आता पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. 'हर्बेरिअम'च्या सांगता महोत्सवात 'तारांगण'प्रकाशनतर्फे 'हर्बेरिअम'हे पुस्तक रंगमंचावरील पडद्यामागील कलाकार सतीश खवतोडे, मधू दळवी,आणि नाटकाची लोकप्रियता ठरवतात त्या रसिक प्रेक्षकांमधून प्रजाक्ता सावंत आणि शोभना बोरकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
सूर्याची पिल्ले','लहानपण देगा देवा','हमिदाबाईची कोठी','आंधळ दळतंय'आणि 'झोपी गेलेला जागा झाला'ही पाच नाटकं मराठी रंगभूमीवरील मानदंड समजली जातात. 'हर्बेरिअम'या उपक्रमाव्दारे ही नाटकं पुन्हा त्याच ताकदीने सुनील बर्वे यांनी सादर केली. या उपक्रमांतर्गत सुनील बर्वे यांनी या काळात घडलेले किस्से, आठवणी शब्दांकित केल्या आहेत. 'तारांगण'या प्रकाशनाची ही पहिली पुस्तकनिर्मिती आहे. पत्रकार-लेखक-संपादक मंदार जोशी यांनी या पुस्तकाव्दारे प्रथमच प्रकाशन विश्वात पदार्पण केले आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, केदार शिंदे, मंगेश कदम, पुष्कर श्रोत्री, नीना कुलकर्णी, भरत जाधव, मंगेश कदम, संपदा जोगळेकर, जयंत सावरकर, संजय मोने, जितेंद्र जोशी, प्रिया बेर्डे, क्षिती जोग, वैभव मांगले, विजू खोटे, आदी मान्यवरांनी या पुस्तकात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आशुतोष गोवारीकर आणि सचिन पिळगांवकरांनीही आपल्या भावना या पुस्तकात व्यक्त केल्या आहेत.