विजय केंकरे
व्यक्तिगत माहिती
- रहाण्याचे ठिकाण
- पुणे
- स्वतःविषयी माहिती
वेस्टेन्ड लंडन पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण करण्याची सवय आपल्या देशात आता काही नवीन नाही..पण खेद याचा आहे की ते अनुकरण कायमच अंधपणे केलं जातं...केवळ आधुनिक गोष्टींबाबत केलं जातं. परदेशांमध्ये, मग ते इंग्लंड असो वा अमेरिका तिकडे रोजच लाईफस्टाईल जास्तीत जास्त प्रगत होण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. पण त्याचवेळी ते इतिहासालाही तितक्याच प्रेमाने जपतात, संस्कृतीची कास धरुन ठेवतात.
साधारणतः वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल, मी लंडन गेलो होतो. नाटकप्रेमी माणसासाठी लंडन म्हणजे खजिनाच असतो. त्यामुळे उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त नाटकं पहायची माझी इच्छा होती. विशेषतः काही खास नाटकं पाहिल्याशिवाय भारतात परतायचंच नाही असं मी अगदी पक्कं ठरवलं होतं. त्यातलंच एक नाटक होतं, केनिथ ब्रेमॅकनं दिग्दर्शित केलेलं हॅम्लेट. केनिथ ब्रेमॅक आज ...... घरातल्या गृहस्थ आहे. तरुण असताना त्यानं स्वःच्या अभिनयाने हॅम्लेट अक्षरशः गाजवलं होतं. त्याच्या अभिनयाची जादू मी स्वतः अनुभवली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे कालातंराने वय होत असताना तो या नाटकातून बाजूला झाला आणि त्यानं आपल्या जागी दुसऱया नटाला तयार करवून घेतलं. आता तर त्याने स्वतःच हॅम्लेट दिग्दर्शित केलं आहे. जे पाहण्याची मला खूप उत्सुकता लागून राहिली होती.
सेंट्रल लंडनला एका थिएटरमध्ये त्याचा शो आहे कळाल्यावर मी तिकिटं काढायला गेलो. तिकिट विंडोवर असलेल्या एका टिपिकल ब्रिटिश महिलेनं मला काहीसं आश्चर्याचे भाव चेहऱयावर आणत तिकिटं संपल्याचं सांगितलं. थोडं लवकर आलो असतो तर तिकिट मिळालं असतं अशी चुटपूट मला लागली, मी सहजपणे तिला ती बोलूनही दाखवली. तेव्हा ती शांतपणे उत्तरली, “ तिकिटं दोन महिन्यांआधीच संपली आहेत ”.( या नाटकाच्या तिकिटांची बुकिंग लंडन बघायला आलेल्या पर्यटकांनी केलेली नसून लंडनच्या रहिवास्यांनी केली होती. ही बाब खरचं आश्चर्यकारक होती.) मी अक्षरशः चाट पडलो. तेव्हा मात्र मी भारतातून आलो आहे, आणि हे नाटक पहायची मला जबरदस्त उत्सुकता आहे हे अगदी कळकळीने मी तिला सांगितलं. तिलाही माझी बाजू समजली असावी, कारण ती म्हणाली, “आम्ही आयत्या वेळेसाठी 20 तिकिटं स्पेअर ठेवतो, जी केवळ शोच्या आधी काढता येतात ”. मला खूप आनंद झाला.
शो दुसऱया दिवशी सकाळी नऊच्या सुमारास होता. त्याआधी येऊन तिकिट काढेन अस मी तिला सांगितलं. तेव्हा तिनं मला विचारलं कुठे राहतोस? मी सांगितलं ‘वॉटफोर्ड’. ती म्हणाली, ‘ मग शक्य नाही, कारण हे ठिकाण सेंट्रल लंडनपासून खूप दूर आहे.’ मी म्हणालो, ‘सकाळी पहिली ट्रेन पकडून मी इथे येईन,’ त्यात काय मोठंसं असंही मला वाटून गेलं. त्यावर त्या ब्रिटिश बाईने जे उत्तर दिलं तो माझ्यासाठी आश्चर्याचा दुसरा धक्का होता. ती म्हणली, “ हि तिकिटं मिळवण्यासाठी पहाटे पाचपासून रांग सुरु होते. त्याआधी तुला एवढ्या लांबून येणं शक्यच नाही ”. ते नाटक मला पहायला मिळालं नाही हे आता काही वेगळं सांगायला नको.
पण हा प्रसंग मला लंडनमधली नाट्य संस्कृती जपणाऱया नागरिकांबद्दल वाटणारा आदर आणखी दृढ करण्यासाठी पुरेसा होता. लंडनसारख्या एका अत्याधुनिक शहरात नाट्य संस्कृती एखाद्या रीतीरिवाजाप्रमाणे जपली जाते हे खरंच कौतुकास्पद आहे. तिथे गेल्यानंतर नाट्य तुमच्या नजरेआड होतच नाही. रस्तोरस्ती, प्रत्येक ठिकाणी नाटकाच्या जाहिराती सतत तुमच्या डोळ्यासमोर येत राहतात. शिवाय स्वस्त दरात तिकिट मिळवून देणारे एजंट्सही तिथे असतात.
थिएटरमध्ये गेल्यानंतर तिथे असणाऱया नाटकांची माहिती देणारं बुकलेट दिलं जातं. केवढी साधी गोष्ट पण प्रेक्षकांच्या कितीतरी सोयीची आहे. सगळ्या एज ग्रुपची नाट्यप्रेमी लोकं अगदी भक्तीभावानं थिएटरमध्ये हजेरी लावतात. आपल्याकडे पूर्वीच्या काळी जसं एखाद्या कुटुंबात नाटकं अगदी हौसेने पाहिली जायची. म्हणजे कुटुंबातली पुरुष लोकं ठेवणीतलं धोतर, टोपी घालून, बायका नथ, भरजरी नऊवारी नेसून टांग्यातनं नाटक पहायला जायची! तसं वातावरण आजही लंडनसारख्या शहरात अनुभवता येतं. कारण तिथे नाटक एक संस्कृती म्हणूनच जपली जाते.
जुन्या, गाजलेल्या नाटकांचे सेट्स ट्रेझर करुन ठेवले जातात. पर्यटन स्थळाप्रमाणे ते विकसित केले जातात. तसंच प्रसिद्ध नाट्य कलाकारांच्या वस्तू, आठवणी म्युझियम उभारुन जपल्या जातात. क्लासिक आणि मॉर्डन अशा दोनही थिएटरची जीवापाड जपणूक सहजपणे, अविरतपणे केली जाते.
माझ्या नाट्यप्रेमी माणसासाठी या सगळ्या गोष्टी खरंच हेवा वाटण्याजोग्याच आहेत. आपल्याकडे नाटकांनी एकेकाळी जो सुवर्णकाळ अनुभवला होता, तो परत यावा आणि तो तसाच कायम रहावा असं मला अगदी मनापासून वाटतं. मी माझ्या परीने प्रयत्न करतोच आहे, प्रेक्षकांनीही साथ दिली तर हे काही अवघड नाही हे मात्र नक्की!
मागोवा
- सदस्यत्व कालावधी
- 2 years 9 आठवडे
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































