कौशल's picture

व्यक्तिगत माहिती

रहाण्याचे ठिकाण
पुणे
स्वतःविषयी माहिती

* कौशल इनामदार (संगीतकार) *
* जन्मगाव - पुणे
* जन्मतारीख - २ ऑक्टोबर १९७१
* शिक्षण - ग्रॅज्युएट (डि.जी.रूपारेल कॉलेज, मुंबई)
* पत्नी - सुचित्रा इनामदार

कौशल इनामदार मराठी संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध आणि वेगळ्या पठडीवर काम करणारा संगीतकार आहे सर्वांनाच माहिती आहे. संगीतात विविध प्रयोग करणारा संगीतकार अशी त्यांची ओळख. अनेक मोठ मोठ्या संगीतकार आणि गायकांबरोबर त्यांनी काम केलं आहे. मात्र कौशल इनामदार यांची सर्वसामान्य लोकात खरी ओळख निर्माण झाली ती ‘मराठी अभिमान गीताने’. सध्या ते अनेक नवीन प्रोजेक्ट्स करत असून त्यातील एक महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई निर्मित ‘बालगंधर्व’ या आगामी चित्रपटाला कौशलने संगीत दिले आहे. फक्त चित्रपटांनाच नाहीतर कौशलने नाटक, जाहीरात, मालिका, अनेक लाईव्ह कॉन्सर्टलाही संगीतकार म्हणून काम पाहिले आहे. कौशलने अनेक मोठमोठ्या गायक आणि संगीतकारांबरोबर काम केलं आहे. त्यात शंकर महादेवन, पं.सत्यशिल देशपांडे, साधना सरगम, सुरेश वाडकर, श्रेया घोषाल, महालक्ष्मी अय्यर, रघुनंदन पणशीकर, शुभा जोशी, निनास कामथ, संजीव चिम्मलगी, हमसिका अय्यर, स्वानंद कीरकीरे, रविंद्र साठे, शिल्पा पै, सोनाली कर्णिक, शोभा जोशी, कर्सन सागथिया, किर्ती सागथिया, संजीवनी भेलांडे, हरिहरन आदी आहेत.

* संगीत कार्य -
मराठी अभिमान गीत, म्युझीक फॉर द ऑफिशिअल सिडी रोम - मिस वर्ल्ड १९९६ बैंगलोर, मुंबई फेस्टीवल ओपनिंग सेरमनी सॉंग, रेन रागा(फ्युजन शो)

* अल्बम -
‘अमॄताचा वसा’, ‘शुभ्र कळ्या मुठभर’, ‘रात्र भिजलेली’, ‘गितेचा तो साक्षी वदला’, ‘भावांजली’, ‘गर्द निळा गगनझुला’, ‘कामना पूर्ती’, ‘मन पाखराचे होई’, ‘चाफ्याचे शिंपन’, ‘अष्टनायिका’,

* चित्रपट -
१) ‘कृष्णा काठची मीरा’ २) ‘आग’ ३) ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ ४) ‘अधांतरी’ ५) ‘रास्ता रोको’ ६) ‘इट्स ब्रेकिंग न्युज’ ७) ‘हंगामा’ ८) ‘बालगंधर्व’ ९) ‘प्रेमाच्या गोवा जावे’

* टेलिफिल्म -
‘पदछाया’, ‘मानसी’, ‘स्पर्श’, ‘आर्चिमेडेस’, ‘ज्वालामुखी’.

· * शॉर्टफिल्म -
‘आय बिलिव्ह’- दिग्दर्शक विशाल इनामदार, ‘पाईपड्रिम’ - दिग्दर्शक विशाल इनामदार, ‘जंक’ - दिग्दर्शक ओंकार महाजन, ‘टायर की हवा पंचर हो गई साहब’ - दिग्दर्शक अभिजीत साटम

* नाटक -
‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘अथांग’, ‘रघुपती राघव राजाराम’, ‘बाई गं कमालंच झाली’, ‘बायकोचा खून कसा करावा’, ‘म्हातारे जमीन पर’.

* जाहीराती आणि रेडिओ स्पॉट्स -
सर्फ़ ऎक्सल, व्हिआयपी अंडरवेअर, व्हिक्स अ‍ॅक्शन ५००, ब्रुक बॉन्ड ताजा टी, ब्रुक बॉन्ड ताज महल टी, फेम फेअरनेस क्रिम, नवनीत डायजेस्ट, एमसीएक्स, व्हिस्पर, कुबल मसाले, रूप संगम, व्हिम, लूकमन-ऎ-हयात ऑईल, बेडेकर पिकल्स, प्रविण पिकल्स, रामबंधू पापड मसाला.

* पुरस्कार -
१) बेस्ट प्लेराईट - ‘गिल्टी ऑर नॉट गिल्टी’(१९९२)
२) बेस्ट कम्पोजर - अश्वमेध (१९९५)
३) केशवराव भोले पुरस्कार (२०००),
४) इंद्रधनु पुरस्कार (२००१)
५) महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२००२)
६) २००७ रापा पुरस्कार
७) विशेष युवोन्मेश पुरस्कार (२००८)
८) कलागौरव पुरस्कार (२००८)

मागोवा

सदस्यत्व कालावधी
2 years 7 आठवडे
ब्लॉग
अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा