डॉ. सलील कुलकर्णी
व्यक्तिगत माहिती
- रहाण्याचे ठिकाण
- पुणे
- स्वतःविषयी माहिती
* एम.बी.बी. एस पदवी घेतल्यावर मेडिसिन प्रॅक्टिस न करता आवड म्हणून जोपासलेली कला सलील व्यवसायीक स्तरावर यशस्वीपणे घेऊन आला आहे. सलीलला संगीतकलेचा वारसा लहानपणापासूनच मिळाला.त्याचे वडील हार्मोनियम, व्हायोलीन, बासरी, माऊथ ऑर्गन, तबला अशी अनेक वाद्यं वाजवत.वयाच्या तिस~याच वर्षी पुणे आकाशवाणीवर त्याने ’जयोस्तुते’ हे गाणे म्हंटले व पाचव्या वर्षी मुंबई दूरदर्शनवर हार्मोनियम वादन केले होते.
* सलीलने शास्त्रीय संगीताचे शिक्षण मोवाती घराण्याच्या पं. गंगाधर पिंपळखरे यांच्याकडे घेतले तर जयमाला शिलेदार यांच्याकडे नाट्यसंगीत तो शिकला. श्री.प्रमोद मराठे यांच्याकडे तो हार्मोनियम शिकला.
* १९९५ सालापासून पुर्णवेळ संगीत हे व्यवसाय क्षेत्र त्याने निवडले. बुद्धिमत्ता, साहित्याचा सखोल अभ्यास, हार्मोनियम वादन व गायन यावरील हुकुमत हे गुणच त्याच्या यशाला करणीभूत आहेत.
* उत्कॄष्ट साहित्यीक मूल्य आसणा~या कवितांची निवड ही त्याच्या संगीतातील करियरची जमेची बाजू आहे.आजही कविता निवडण्याच्याबाबत तो चोखंदळ आहे.
* ’तरीही वसंत फुलतो ’ या त्याच्या पहिल्या अल्बमपासूनच त्याने सुधीर मोघे, बा.भ. बोरकर या सारख्या कवींच्या रचनांना सुरेख चाली लावल्या आहेत.
* संदिप खरेच्या बरोबर केलेला ’आयुष्यावर बोलु काही ’ हा एक आगळा वेगळा प्रयोग प्रेक्षकांच्या लगेच पसंतीस उतरला आणि सलील कुलकर्णी हे नाव मराठी माणसाच्या घरा घरात पोहोचले.या कार्यक्रमाचे ५०० प्रयोग त्यांनी यशस्वीपणे पुर्ण केले.
* स्वप्नात पाहिली राणीची बाग,एकदा काय झाले,आता खेळा नाचा, अग्गोबाई ढग्गोबाई असे अनेक बालगीतांचे अल्बम सलीलने प्रकाशीत केले आहेत. या अल्बममधली गाणी सर्व लहान मुलांच्यातच नव्हे तर मोठ्यांच्यातही लोकप्रिय झाली.
* सलीलने गेल्या काही वर्षात पुरुषोत्तम बेर्डे, जतिन वागळे, गिरीश मोहिते ,गजेंद्र अहिरे अश्या नामवंत दिग्दर्शकांबरोबर विविध विषयांवर आधारित संगीत दिग्दर्शन केलं आहे. ’विठ्ठल विठ्ठल’ चित्रपटाने सलीलला अल्फा गौरव, मटा सन्मान, राज्यशासन पुरस्कार येवढेच नाही तर २००४ सालचे संगीत विभागातले सर्वच्या सर्व पुरस्कार मिळवून दिले. सुरेश वाडकर, बेला शेंडे, सुनिधी चौहान, रवींद्र साठे, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बालसुब्रमणियम अश्या अनेक गायकांनी त्याच्या दिग्दर्शनाखाली गायन केले.
’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपाटातील गाणी सलीलच्या प्रयोगशील विचारसरणीकडे लक्ष वेधुन घेतात.
काही वर्षापासूनच "सारेगमप" या शोमुळे गायक व संगीतकार म्हणून ओळखला जाणारा सलील हा त्याच्या खास शैलीतील नेमकं बोलणारा परिक्षक म्हणूनही लक्षात राहीला आहे.
आजही सलीलचा विविध गाण्यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळांमध्ये सहभाग असतो तसेच त्याने पुणे येथे त्याच्या संगीत शाळेची स्थापनाही केलेली आहे.
* रंगमंचीय कार्यक्रम :
* तरिही वसंत फुलतो : सुधीर मोघे, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, संदिप खरे, अनिल कांबळे यांच्या कवितांना केलेल्या स्वतंत्र स्वररचनांचा कार्यक्रम.
* स्वप्नात पाहिली राणीची बाग व अग्गोबाई ढग्गोबाई हा बालगीतांचा कार्यक्रम
* आयुष्यावर बोलु काही: हा संदिप खरे बरोबरचा कार्यक्रम( हॉलंड, जपान, इंग्लंड, अमेरिका ,युनायटेड अरब येथे प्रयोग)
* रवींद्र साठे, पं.शौनक अभिषेकी, श्रिकांत पारगावकर, अनुराधा मराठे,अंजली मराठे, सावनी शेंडे इ. गायक कलाकारांसोबत भारतभर शंभरहून अधिक सांगितीक कार्यक्रम.
* प्रकाशीत अल्बम :
*तरीही वसंत फुलतो
* स्वरभाव
*आनंद पहाट
* माझेच गीत मी म्हणते
* बरसे बदरिया
* भजों रे मन
* महादेवा
*वेधा रे पंढरी
* हरिभजन
* माझ्या मना
* तरूणाई
* आयुष्यावर बोलु काही
* नामंजूर
* सांग सख्या रे
*डिबाडी-डिप्पांग
*स्वप्नात पाहिली राणीची बाग
* एकदा काय झाले
* आता खेळा नाचा
* अग्गोबाई ढग्गोबाई
* संधीप्रकाशात
* क्षण मोहरते.
*संगीत दिग्दर्शन*
( चित्रपट)
* विठ्ठल विठ्ठल
* पांढर
* हाऊसफुल्ल
* चकवा
* तूला शिकविन चांगला धडा
* मस्त कलंदर
* कालचक्र
* बंड्या आणि बेबी
* निशाणी डावा अंगठा
* जावई बापू जिंदाबाद
* एक उनाड दिवस
* आनंदी आनंद
* हाय काय नाय काय
(मालिका )
* वहिनीसाहेब
* सिध्दिविनायक महिमा
* शक्ती
* सावित्री
* गोलगप्पा.
*पुरस्कार*
केशवराव भोळे पुरस्कार १९९९
पु.ल. तरूणाई पुरस्कार
राम कदम पुरस्कार २०००
पुणे की आशा पुरस्कार २००४
अष्टपैलू संगीतकार पुरस्कार २००४
"विठ्ठल विठ्ठल" अल्फा गौरव आणि म.टा सन्मान तसेच राज्यशासन पुरस्कार २००४
"निशाणी डावा अंगठा " सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार २००८
इंद्रधनु युवोन्मेष पुरस्कार २००८
झी गौरव २००९
मागोवा
- सदस्यत्व कालावधी
- 2 years 12 आठवडे
- ब्लॉग
- अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































