प्रसाद ओक

प्रसाद ओक's picture

व्यक्तिगत माहिती

रहाण्याचे ठिकाण
पुणे
स्वतःविषयी माहिती

1) पूर्ण नाव- प्रसाद प्रभाकर ओक
2) जन्मगाव- पुणे
3) भावंड- लहान भाऊ
4) बायकोचे नाव- मंजिरी
5) पहिला परफॉर्मन्स- महाराष्ट्राची लोकधारामध्ये गायन
6) आवडता हॉलिडे स्पॉट- हॉलिडे आवडत नाही.
7) आवडता परफ्युम- इसिमियाके
8) आवडती गाडी- फेरारी
9) आवडतं शहर- पुणे
10) आवडती डिश- प्रॉन्स

पर्सनल माहिती
1) आवडता अडव्हेंचर स्पोर्ट- कोणताच नाही
2) निकनेम- पश्या
3) कलाकार नसता तर- दिग्दर्शक
4) आवडता ऋतू- हिवाळा
5) आवडती ऑन-स्क्रीन जोडी- अमिताभ- रेखा, अनिल कपूर- माधुरी
6) आवडतं आईस्क्रीम- सिताफळ फ्लेवर
7) एखादी अपूर्ण इच्छा- दिग्दर्शक म्हणून मरायचंय
8) ए रोल यू विल डाय फॉर- अग्नीपथमधला विजय चौहानचा रोल
9) थ्री थिंग्ज वी डोन्ट नो अबाऊट-
1) मी बऱयापैकी कविता करतो.
2) शाळेत असताना मी स्विमिंग चॅम्पियन होतो.
3) याव्यतिरिक्त माझ्याबदद्ल काही माहित नसण्याजोगं असेल असं वाटत नाही.
10) आवडता कट्टा- बोरिवलीचं नाईट एव्हिल आणि पार्ल्यातलं पुरेपुर कोल्हापूर..

*आतापर्यंतची वाटचाल*

खर्‍या कलाकारासाठी सतत नवनिर्मिती करत रहाणं ही केवळ एक इच्छा नसते तर ती गरज असते हे तत्व प्रसाद ओकसारख्या बहुगुणी कलाकाराला अगदी तंतोतंत लागू होतं. गेल्या तब्बल वीस वर्षांच्या करियरमध्ये तो मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात लीलया वावरत आला आहे. अभिनय, दिग्दर्शन, गायन, लेखन अशा प्रत्येक क्षेत्रात क्षेत्रात या अष्टपैलू कलाकाराने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे.
आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत वीसपेक्षा जास्त मराठी नाटके, ४० चित्रपट, ५७ मराठी आणि ५ हिंदी सिरीयल्समधून प्रसादने रसिकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे कॅमेऱयासमोर मिळणारं यश, कॅमेऱयामागे राहूनही संपादन करणाऱया मोजक्या मंडळीमध्ये प्रसादची गणना होते. त्याने दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट यशस्वी झाल्याने यशस्वी दिग्दर्शकांच्या वर्तुळात त्याचं नाव घेतलं जातं. चित्रपट, मालिका, जाहिराती, गायन अशा सर्वच क्षेत्रांत नाव कमावूनही प्रसादचं मन खऱया अर्थाने रमतं ते रंगभूमीवर. मराठी नाटकांबाबत वाटणाऱया जिव्हाळ्यामुळेच प्रसाद लीड समूहाच्या सहकार्याने अंतरंगसारखी सेलिब्रेटी दिग्दर्शकांची एकांकिका स्पर्धा आयोजित करतो आहे, जिची गणना नाटकांच्या इतिहासातला माईलस्टोन म्हणून केली जात आहे.

मागोवा

सदस्यत्व कालावधी
2 years 12 आठवडे
ब्लॉग
अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा