मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वे's picture

व्यक्तिगत माहिती

रहाण्याचे ठिकाण
मुम्बई
स्वतःविषयी माहिती

1) पूर्ण नाव- मुक्ता वसंत बर्वे
2) जन्मगाव- चिंचवड
3) भावंड- मोठा भाऊ
4) पहिला परफॉर्मन्स- सुयोग निर्मित आम्हाला वेगळं व्हायचंय हे नाटक
5) आवडता हॉलिडे स्पॉट- खूप आहेत. पण कोकण सगळ्यात आवडतं.
6) आवडता परफ्युम- सध्या तरी सेलिन डिऑन...पण परफ्युमपेक्षाही मला अत्तरं जास्त आवडतात.
7) आवडती कार- भरपूर आहेत. मला वेगवेगळ्या कार प्रचंड आवडतात. पण सगळ्यात लाडकी कार म्हणजे मी स्वकमाईतून घेतलेली पहिली व्हाईट झेन
8) आवडतं शहर- मुंबई
9) आवडती डिश- भाकरी आणि वांग्याची भाजी, उकडीचे मोदक, गुलाबजाम

पर्सनल
1) आवडता अडव्हेंचर स्पोर्ट- अडव्हेंचर नो वे... मी अजिबात ऍडव्हेंचरस नाहीये.
2) निकनेम- बहुतेक सर्व जण मुक्ता म्हणतात, अगदी काही जण मुक्ती मुक्तु वगैरे म्हणतात.
3) कलाकार नसते तर- गायिका असते. पण माझ्यात ते पोटेन्शियल नाहीये. मला गायकांचा अतिशय हेवा वाटतो, आणि जे गायक नेमाने रियाज करत नाहीत त्यांचा राग येतो.
4) आवडता ऋतू- हिवाळा
5) आवडती ऑन-स्क्रीन जोडी- रोमँटिक पिक्चर असेल तर शाहरूखबरोबर कोणतीही हिरॉईन आणि जॉनी डिपबरोबर कोणीही अक्षरशः कोणतीही हिरॉईन...हि इज माय हार्टथ्रोब....
6) आवडतं आईस्क्रीम- टेंडर कोकोनट आणि पुण्यातली मँगो तसंच सीताफळ मस्तानी
7) एखादी अपूर्ण इच्छा- ज्या भक्तीताई बर्वेंमुळे मी या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा घेतली त्यांच्यांबरोबर काम करायचं होतं. आमचे चांगले रिलेशन्स होते पण अशी वेळ येण्यापूर्वीच त्या आपल्याला सोडून गेल्या. तसंच निळूभाऊंशी माझी ओळख अशी नव्हती पण एक माणूस आणि कलावंत म्हणून ते मला खूप भावतात. त्यांच्याबरोबरही काम करायची इच्छा होती जी आता अपूर्णच राहिल.
8) ए रोल यू विल डाय फॉर- असा कोणताच रोल नाही ज्यासाठी आय विल डाय...कारण खूप चांगल्या स्क्रिप्ट्स आणि भूमिका येत राहतातच...ज्या नक्कीच माझ्या वाट्याला येतील.
9) थ्री थिंग्ज वी डोन्ट नो अबाऊटः
1) मी बऱयापैकी लिखाण करू शकते.
2) माझं प्राणीप्रेम अफाट आहे.
3) मी चांगल्यापैकी शिवणकाम करते. हे खरं वाटणार नाही पण मी अगदी कॉलेजमध्ये असतानाही कपडे, छोट्या पर्स असं भरपूर शिवणकाम केलयं.
10) आवडता कट्टा- बँडस्टँडला समुद्रकिनाऱयाजवळ एक कॅफे आहे जिथे मित्र- मैत्रिणींबरोबर गप्पा मारायला मी कायम जाते.

आतापर्यंतची वाटचाल
पुण्याच्या "ललीत कला केंद्र"सारख्या, मातब्बर व अनुभवी शिक्षकांच्या संस्थेतुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवून विचारपुर्वक या क्षेत्रात पाऊल टाकणारी मुक्ता, ही आज मालिका, चित्रपट, किंवा नाटक या तीनही माध्यमांमध्ये प्रभाविपणे वावरताना दिसते आहे.

नाटकासारख्या प्रभावी माध्यमाद्वारे तिने या क्षेत्रात पदार्पण केले. सुरूवातीच्या काळापासूनच अनेक एकांकिकांद्वारे तिने आपल्या आभिनयाची छाप पाडलेली दिसते. " पांढ~या घोड्यावरचा राजपूत्र " ही गिरिश जोशी लिखित व दिग्दर्शीत व शशांक शेंडेबरोबर काम केलेली त्यापैकीच एक एकांकिका होय.

"देहभान", "आम्हाला वेगळे व्हायचंय", "फाईनल ड्राफ्ट", "हम तो तेरे आशिक है " "कबड्डि-कबड्डी " अश्या व्यवसायीक नाटकांमुळे ती रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.

"पिंपळपान","श्रीयुत गंगाधर टिपरे ","बुवा आला" ,"बंधन ","आभाळमाया " "इंद्रधनुष्य", "घडलयं बिघडलंय " "अग्निशिखा" अश्या अनेक मराठी मालिकांमध्ये तिने काम केलेले आहे. तसेच "आम्ही मराठी पोरं हुषार" या मराठी गेम शोचे तिने सुत्रसंचालन केले आहे.

२००४-२००५ साली मराठी व्यवसायीक व प्रायोगिक रंगभूमीवर आलेल्या " फाईनल ड्राफ्ट " या नाटकाने तिच्या अभिनयक्षमतेचा ख~या अर्थाने वेध घेतला. ती एक परिपक्व अभिनेत्री म्हणून लोकांच्या समोर उभी राहिली. तिने काम केलेल्या सगळ्याच नाटकांनी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अथवा सह अभिनेत्रीचे पुरस्कार मिळवून दिले.

मालिकांबरोबरच मराठी व हिंदी सिनेमांमध्ये ती यशस्वीपणे अभिनय करतांना दिसते आहे. "चकवा", "थांग", "मातीमाय", "सावर रे", "दे धक्का", "एक डाव धोबीपछाड", "चकवा"," सास बहू और सेंसेक्स" हे त्यापैकी काही चित्रपट .....

सध्या प्रसारीत होणारी स्टार प्रवाह वरील " अग्निहोत्र" या मलिकेतील तिने साकारलेले "मंजूळा "हे पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरत आहे .

अभिनेत्री म्हणुन प्रस्थापित होण्याआधी मुक्ता शिकत असताना वेगवेगळ्या नाटकांचे कॉस्च्युम्स किंवा संगीतही करत असे.

सतीश आळेकर, विजया मेहता, विजय केंकरे , वामन केंद्रे, गिरिश कर्नाड, भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, महेश एलकूंचवार, राजिव नाईक, समर नखाते अश्या दिग्गज व प्रतिभावान लोकांचे मार्गदर्शन तिला अभिनेत्री म्हणून घडण्यास खूप उपयोगी पडलेले आहे.

अभिनयाकडे बघण्याचा तीचा असा एक वेगळा द्रूष्टिकोन तिला तथाकथित "करियर" करु पहाणा~या इतर अभिनेत्रींपासुन वेगळे पाडतो. हा तीचा दॄष्टीकोनच तिच्यासाठी यशाची नवनवीन दारे उघडेल यात शंकाच नाही.

पुरस्कार :

* २००२-२००३ "देहभान" सर्वोत्कॄष्ट सह अभिनेत्री, अल्फा गौरव पुरस्कार

* सर्वोत्कॄष्ट नवा चेहरा , अल्फा गौरव पुरस्कार

* २००४-२००५ " चकवा" सर्वोत्कॄष्ट नवा चेहरा, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

* "फाइनल ड्राफ्ट ", सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री, प्रायोगीक रंगभुमी अल्फा गौरव पुरस्कार

* " हम तो तेरे आशिक है " सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री, व्यवसायीक रंगभुमी अल्फा गौरव पुरस्कार

* " हम तो तेरे आशिक है " सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री, मटा सन्मान

* २००५-२००६ "फाइनल ड्राफ्ट ",सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री, व्यवसायीक रंगभुमी अल्फा गौरव पुरस्कार

* "फाइनल ड्राफ्ट ",सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

* २००६-२००७ " कबड्डि-कबड्डी "सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री, व्यवसायीक रंगभुमी झी गौरव पुरस्कार

* " कबड्डि-कबड्डी "सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री, मटा सन्मान

* " कबड्डि-कबड्डी "सर्वोत्कॄष्ट अभिनेत्री महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

* "घडलंय-बिघडंलय " नामांकन सर्वोत्कृष्ट निवेदक , झी गौरव पुरस्कार

* २००७-२००८ "घडलंय-बिघडंलय " नामांकन सर्वोत्कृष्ट निवेदक , झी गौरव पुरस्कार

मागोवा

सदस्यत्व कालावधी
2 years 12 आठवडे
ब्लॉग
अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा