मृणाल कुलकर्णी
व्यक्तिगत माहिती
- रहाण्याचे ठिकाण
- पुणे
- स्वतःविषयी माहिती
* पूर्ण नाव- मृणाल रुचिर कुलकर्णी
* जन्मगाव- पुणे
* भावंड- बहिण
* नवऱयाचे नाव- रुचिर कुलकर्णी
* पहिला परफॉर्मन्स- रॉय किणीकरांच्या रुबायांवर आधारित उत्तररात्र हा कार्यक्रम
* आवडता हॉलिडे स्पॉट- राजगड, ऑस्ट्रिया
* आवडता परफ्युम- 15th avenue
* आवडतं शहर- पुणे कारण ती माझी जन्मभूमी, मुंबई कारण ती माझी कर्मभूमी आणि लंडन जिथलं वातावरण मला मनापासून भावतं, विशेषतः तिथली म्यूझियम्स...कारण तिथे इतिहासाचे जतन अत्यंत सुंदर पद्धतीने केलं जाते.
* आवडती डिश- घरी बनवलेले फ्राईड बोंबिल.* पर्सनल माहिती *
* आवडता अडव्हेंचर स्पोर्ट- रिव्हर राफ्टिंग.
* निकनेम- नाही.
* कलाकार नसता तर- बिझनेस वूमन असते.
* आवडता ऋतू- पावसाळा, त्यातही पुणे- मुंबई एकस्प्रेस वे वरती प्रवास करताना अनुभवायला मिळणारा पाऊस.
* आवडती ऑन-स्क्रीन जोडी-
* आवडतं आईस्क्रीम- नॅचरल्सचं अंजीर आईसक्रीम.
* एखादी अपूर्ण इच्छा- खूप आहेत, किंबहुना तो एका वेगळ्या आर्टिकलचा विषय होईल.
* ए रोल यू विल डाय फॉर- खरं तर मी न केलेली प्रत्येक चांगली भूमिका यात येईल, पण त्यातही लिओ टॉलस्टॉयने लिहलेली अऩा कॅरनिनाचं पात्र रंगवायची खूप इच्छा आहे.
* थ्री थिंग्ज वी डोन्ट नो अबाऊटः
1) अडव्हेंचर स्पोर्ट्स मनापासून एन्जॉय करते. (माझ्याकडे पाहून पटत नसलं तरी)
2) मी बऱयापैकी पेटिंग्जस करते.
3) मला वाटतं, सगळ्या अननोन गोष्टी सांगितल्या तर कुतूहलाचा भाग राहणारच नाही.
* आवडता कट्टा- मी फूडी नाही तसंच गप्पिष्टही नाही त्यामुळे गप्पांचा किंवा खादडण्याचा असा स्पेसिफिक कट्टा मी सांगू शकत नाही.* आतापर्यंतची वाटचाल *
* बुद्धिमत्ता, सौदर्य आणि प्रतिभा यांचे एकत्रित वरदान लाभलेली मृणाल ही मराठी आणि हिंदी मनोरंजन जगतातीत एक नावाजलेली अभिनेत्री आहे. उच्च शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात तीच्या अनुभवांना मिळालेल्या गौरवांवरून आपल्याला तिच्यातील प्रतिभा लक्षात येते.
* पुणे विद्यापिठाच्या "मास्टर इन लिटरेचर" या पदवीबरोबरच तीने साहित्य व भाषाशास्त्रामध्ये सा.ग. माळशे स्कॉलरशीपही मिळवली आहे. "स्वामी" या तिच्या पहिल्या मालिकेमध्येच ती घरोघरी पोहोचली असली तरी, ऎतिहासिक भूमिकांचा धागा तिला रंगमंचावरच मिळाला होता. स्वामीनंतर तिला कधीही मागे वळून बघावेसे वाटले नाही. तीने बासू भट्टाचार्य,जब्बार पटेल, अमोल पालेकर,गजनान जागिरदार,वेद राही, रवि राय,विकास देसाई, संजय सूरकर ,संजय खान, साराभाई देवधर, गजेन्द्र आहिरे या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केले आहे.
* रमाबाई , मीरा, द्रौपदी यांसारखी भावनांच्या वेगवेगळ्या छाटा असलेली भारतीय स्त्रीपात्रे अभ्यासूवृत्तीने साकारण्याची दुर्मीळ संधी तिला मिळाली आणि तिने त्याचे सोने केले. त्याचबरोबर "जोडीदार" सिनेमातील दूहेरी भूमिकेने तिला त्याचवर्षी दोन बक्षिसेही मिळवून दिली. आव्हान स्विकारायला ती सतत तयार असते. तिच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा हा तिने साकारलेल्या पात्रांमध्ये खूप सहज जाणवतो, त्यामूळेच भारतभरातील दर्शकांनी तिला आपलेसे केले आहे. तिचे प्रभावी अस्तित्व, प्रेक्षकांवरची पकड आणि लक्षवेधी अभिनय यामूळे ती समीक्षकांची वाहवा मिळवते. तिने काही प्रादेशीक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.
*महत्वाच्या टेलीव्हिजन सिरियल्स:
* मराठी:
स्वामी, पिंपळपान, राजश्री शाहू महाराज, आवंतिका, आणि आंतरराष्ट्रीय प्रवास मालिका, "हॅपि जर्नी", सेलिब्रिटी चाट शो "दावत", महामालिका "राजा शिवछत्रपती"* हिंदी:
श्रीकांत, द ग्रेट मराठा, हसरतें, चट्टान, मीरा, टिचर, द्रौपदि, स्पर्श, झूटा सच, नूरजहा, संब्धन, सोनपरी, जिंदगी तेरी मेरी कहानी, आरजू है तू, जीत, सोला सिंगार, झूम ईंडिया ( रियालिटी शो), निलांजना, राजाकी आयेगी बारात.* सिनेमा *
* मराठी:
माझा सौभाग्य, जमले हो जमले, लेकरू, घराबाहेर, जोडीदार, विश्वास, रास्ता रोको, बयो, थांग, राजकारण, तूझ्या-माझ्यात, मेड ईन चायना.* हिंदी:
कमला की मौत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विर सावरकर, उफ क्या जादू मूहोबत हॆ, कूछ मिठा हो गया, आशिक.* इंग्लीश:
क्वेस्ट ( नॅशनल ऍवोर्ड)* पुरस्कार आणि मानांकने :
"माझा सौभाग्य " महाराष्ट्र शासनाचा सर्वोकॄष्ट अभिनेत्री पुरस्कार
"घराबाहेर" महाराष्ट्र शासनाचा सर्वोकॄष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
"जोडीदार" दूहेरी भूमिकेसाठी विडिओकॉन आणि फिल्मफेअर पुरस्कार
* "मीरा" अशिर्वाद पुरस्कार.
* ग.दी. मा. प्रतिष्ठान पुरस्कार, पुणे
* चलचित्र पूरस्कार, दिल्ली.
* सुरभी नैपुण्य पूरस्कार
* नवी मूंबई नाट्य प्रतिष्ठानचा भक्ति बर्वे पुरस्कार २००३
* "अवंतिका" म.टा. सन्मान २००३.
* कलाकार पुरस्कार २००३
* कला गौरव पुरस्कार, पिंपरी चिंचवड , २००३
* समन्वय पुरस्कार, मध्य प्रदेश, २००३
* "जोडीदार" म.टा. सन्मान २००३
* "अवंतिका" म.टा. सन्मान २००३.
* "सोनपरी" स्टार परिवार पुरस्कार २००३
* "अवंतिका" आपला अल्फा पुरस्कार २००४
* राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार २००५
* "थांग" म.टा. सन्मान २००६
* तेजस्विनी पुरस्कार २००६, सिनेमा आणि मालिका क्षेत्रातील कामगिरीबद्दल.
* "थांग" चित्रपती व्हि.शांताराम पुरस्कार नामांकन २००७
* "रास्ता रोको" संस्कृती कलादर्पण पुरस्कार २००७
* "दावत" सर्वोत्कृष्ट निवेदक म.टा. सन्मान २००८
* अभिनयाच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्मिता पाटील पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषद.* मॄणाल कमर्शियल उत्पादनांचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व करते. काही नावे.......
१. विको वज्रदंती आणि विको टर्मरीक
२. जॉन्सन ऍंड जॉन्सन बेबी प्रोडक्ट
३. पू.ना. गाडगीळ ज्वेलर्स
४. लोकमत ग्रुप ऑफ पेपर्स
५. घडी डीटर्जंट
६. महाराष्ट्र स्टेट लॉटरी
७. आयडिया सेल्यूलर
८. दिशा डेव्हलपर्स, औरंगाबाद
९. गोयल गंगा डेव्हलपर्स, पुणे
१०. प्राईड कंस्ट्रक्शन
११. सकाळ ग्रुप ऑफ पेपर्स
१२. गार्डियन हॉलिडेज
१३. वेडिक्यूअर वेलनेस
"वूमन ऍचिवर ऍवोर्ड" देऊन तिच्या कलेचा आणि परिश्रमांचा योग्य सन्मान केला गेला. "लेकरू" या तिच्या सिनेमास, कॅलिफोर्नियातील 'मिल व्हॅली' फेस्टीवलमध्ये नामांकन मिळाले होते. गजेन्द्र आहिरे दिग्दर्शित "बयो" हा तिचा सिनेमा भारतीय पॅनोरमामध्ये निवडला गेला होता. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले होते.* काही मासिके आणि पेपर्ससाठी तिने फक्त लिखाण न करता "लोकमत" सारख्या भरपूर खपाच्या पेपरमधील युवा पुरवणीचे पाहुणी संपादक म्हणून काम पाहीले. पुर्वीपासून समाज मानशास्त्रीय बाबींवर लिहीणारी मृणाल आता महिलांसाठी "मैत्रिण" नावाचे मासिकही चालवते. या मासिकाने आपली ४ वर्षे पूर्ण केली असून ते समाजातील सर्व थरांमध्ये आवडीने वाचले जाते.
* सध्या ती सकाळ पेपर्सच्या "तनिष्का" या मासिकाची अतिथी संपादक म्हणून काम पहाते.
* समकालीन प्रकाशनाकडून प्रकाशित झालेले " मेकअप उतरल्यावर " हे तिचे ललित लेखनही वाचकांची दाद मिळवते.
* ग्लॅमरच्या जगातील मृणालला सामाजिक जबाबदारीचेही भान आहे हे खूप कमी जणांना माहित आहे. "आपले घर" या पुण्यातील अनाथाश्रमाची ती डायरेक्टर म्हणून काम पहाते. मृणालचे आत्तापर्यंतचे यश तिला थांबवत नाही. ती नम्रपणे पुढच्या उद्दिष्टांच्या शोधात असते.
मागोवा
- सदस्यत्व कालावधी
- 2 years 12 आठवडे
- ब्लॉग
- अलिकडील ब्लॉग नोंदी वाचा
आलटून पालटून स्पेशल

आपला आगमन क्रमांक आहे
रंगकर्मींची होळी
मराठी मनोरंजन विशेष
-
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये हिट असणारा सिक्वेलचा फॉर्म्युला आता मराठीतही येऊ घातलाय. ३ फेब्रुवारीला...
-
`अंबोजोगाई चित्र' निर्मित'श्री संत कृपा प्रा.लि.आणि'पूजा फ्लिम्स प्रॉडक्शन'प्रस्तुत 'ब्लफमास्टर'य...
-
सुरूवातीपासूनच सकस आणि दर्जेदार भूमिका करणारी करणारी अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित ओळखली जाते....
-
मराठी आणि हिंदी चित्रपट,मालिका,जाहिराती,सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका साकारणारी गुणी अभिनेत्री...
-
झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'फू बाई फू'चा चौथा सिझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या...
-
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित 'उंच माझा झोका गं'ही नवीन मरा...
-
महाराष्ट्राचे लाडके लेखक, संगीतकार आणि अभिनेते आपले पु.ल.देशपांडे यांच्या समग्र साहित्याच्य...
आजचा वाढदिवस











 copy.slideshow.jpg)


























.slideshow.jpg)
























 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)




































 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)



 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)
 copy.slideshow.jpg)









































 copy.slideshow.jpg)






































